- अजित पवारांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली
- सुनेत्रा पवार यांना अर्थ खातं न देता उत्पादन शुल्क, युवक कल्याण आणि क्रीडा खातं देण्यात आले
- सुनेत्रा पवार यांना आता पुणे आणि बीड जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद दिले आहे
अजित पवारांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांनी त्यांची जागा घेतली. त्यांची उपमुख्यमंत्रीपदावर वर्णी लागली. मृत्यूच्या चौथ्या दिवशी त्यांनी तातडीने उपमुख्यंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर सुनेत्रा पवार यांना कोणतं खातं मिळणार याची चर्चा सुरू झाली. अजित पवारांचे उपमुख्यमंत्रीपद सुनेत्रा पवारांना मिळालं. पण अजितदादांचे अर्थ खातं मिळणार का हे महत्वाचं होतं. पण तसं घडलं नाही. त्यांना अर्थ खातं मिळालचं नाही. त्यांना तुलनेनं कमी असलेल्या उत्पादन शु्ल्क,युवक कल्याण आणि क्रीडा खातं देण्यात आलं. त्यामुळे थोडा नाराजीचा सुर होता. पण ही नाराजी दुर करण्याचा प्रयत्न आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
अजित पवार यांनी सत्तेत जाताना अर्थ खातं स्वत:साठी मागून घेतलं होतं. पण त्यांच्या मृत्यूनंतर ते खातं सुनेत्रा पवार आणि त्या अनुशंगेने राष्ट्रवादी काँग्रेसकडे येणं स्वाभाविक होतं. पण ते खातं देणं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाळलं. त्यामुळे एकीकडे उपमुख्यमंत्रीपद मिळाल्याचा आनंद असताना दुसरीकडे अर्थ खातं हातून निसटल्याचं दुख: होतं. त्यामुळे राष्ट्रवादीतही उलटसुलट चर्चा सुरू होती. अर्थ खात्या येवढचं महत्वाचं खातं सुनेत्रा पवार यांना मिळावं अशी मागणी होत आहे.
अशात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही नाराजी दुर करण्याचा प्रयत्न केला आहे. अजित पवारांकडे असलेल्या दोन महत्वाच्या जबाबदाऱ्या सुनेत्रा पवार यांच्याकडे कायम ठेवण्यात आल्या आहेत. त्यातील एक म्हणजे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हे यापुढे ही सुनेत्रा पवार यांच्याकडेच राहील. तर पुण्या प्रमाणे बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सुनेत्रा पवारच सांभाळणार आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हे सुनेत्रा पवार यांना देण्यात आले आहे. पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासाठी याआधी चंद्रकांत पाटील हे आग्रही होते.
दरम्यान दोन्ही जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देवून डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय ही घेण्यात आला आहे. त्यात सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री यांच्याकडे बीड आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जाबाबदारी देण्यात आली आहे. पुणे जिल्हा हा राष्ट्रवादीचा गड मानला जातो. त्यामुळे ही बाब सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादीसाठी महत्वाची समजली जाते.