कर्नाटक सरकारने बॉलीवूड अभिनेत्री तमन्ना भाटियाला कर्नाटक सोप्स अँड डिटर्जंट लिमिटेड (KSDL) ची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्त केले आहे. ही कंपनी म्हैसूर सँडल साबण तयार करते. राज्य सरकारने बुधवारी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, भाटियाची दोन वर्षे आणि दोन दिवसांसाठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, त्यावर 6.2 कोटी रुपये खर्च येणार आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या निर्णयावर समाजातील काही स्तरांतून तीव्र टीका झाली आहे. शिवाय तमन्नाच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. एका महिलेने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट लिहून या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तिने लिहिले, "जेव्हा आशिका रंगनाथसारख्या स्थानिक कन्नड तरुण अभिनेत्रीला ब्रँड ॲम्बेसेडर बनवता येते, तर हिंदी अभिनेत्रीची नियुक्त करुन सरकारला काय साध्य करायचे आहे असा प्रश्न त्यांनी केला आहे.
यावर प्रतिक्रिया देताना राज्याचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री एम. बी. पाटील यांनी गुरुवारी सांगितले की, हा निर्णय "कर्नाटकचे उत्पन्न बाहेरच्या बाजारातही तेवढ्याच ताकदीने विकले जावे यासाठी घेतलेला हा निर्णय आहे. खूप विचारविनिमय करून हा निर्णय घेतला असल्याचं ही त्यांनी सांगितलं. पाटील म्हणाले की, KSDL कन्नड चित्रपट उद्योगाचा खूप आदर करते. कन्नड चित्रपट हे बॉलीवूड चित्रपटांनाही टक्कर देत आहेत, असं ही ते यावेळी म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - Navi Mumbai News: चमत्कार! 15 मिनिटे हृदय बंद, तरीही जीव वाचला, हे कसं शक्य झालं?
KSDL ने 2024-25 मध्ये 1785.99 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. 20230 पर्यंत 5000 कोटी रुपयांचे लक्ष्य गाठण्यासाठी 435 नवीन वितरक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर हे उत्पादन घेवून जाण्याची ही योजना आहे. कन्नड संघटना कन्नड रक्षण वेदिकेने तमन्नाला ब्रँड ॲम्बेसेडर बनवण्यावर आक्षेप घेतला आहे. संघटनेचे म्हणणे आहे की KSDL कन्नड लोकांच्या गौरवशाली इतिहासाचा भाग आहे. अशा परिस्थितीत गैर-कन्नड भाषिक व्यक्तीला तिचा चेहरा बनवणे अयोग्य आहे. सामाजिक कार्यकर्ते मरिलींगेगौडा पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गैर-कन्नड अभिनेत्रीच्या नियुक्तीवर आक्षेप घेतला आहे.