एकीकडे मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढत आहे. त्यावर नियंत्रण कसे मिळवावे हा खरा प्रश्न आहे. अशात एका खासदाराने एक अनोखी ऑफीर दिली आहे. त्यात ज्या महिलेला तीन आपत्य होतील त्यांना 50,000 हजाराचे बक्षिस जाहीर केले आहे. त्यात जर मुलगा झाला तर एक गाय ही दिली जाणार आहे. या अनोख्या ऑफरमध्ये सर्वांच्या भूवाया उंचावल्या आहेत. त्यामुळे हे खासदार महाशय कोण याची चर्चा चांगलीच रंगली आहे.
'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
खासदार आप्पाला नायडू असं त्यांचं नाव आहे. ते आंध्र प्रदेशातल्या विजयनगर लोकसभा मतदार संघातून निवडून येतात. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे ते जवळचे समजले जातात. जास्त मुलं जन्माला घालण्यासाठी हे नायडू प्रोत्साहन देत आहे. ज्या महिलेला तीन मुले होतील तिला 50,000 रुपये बक्षिस दिलं जाणार आहे. तर मुलगा झाला तर एक गाय भेट दिली जाईल. हे सर्व आप्पाला आपल्या खिश्यातून देणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं आहे. त्यांची ही घोषणा चांगलीच व्हायरल झाली आहे. टीडीपीचे कार्यकर्ते ही ऑफर व्हायरल करत आहेत.
आप्पाला यांनी केलेले हे आवाहन म्हणजे आंध्र प्रदेशच्या लोकसंख्या वाढीसाठी क्रांतीकारी पाऊल असेल असं आता त्यांच्या पक्षाचे नेते म्हणत आहे. शिवाय मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनीही त्यांना शाब्बासकी दिली आहे. जागतिक महिला दिनी ही ऑफर खासदार साहेबांनी दिली होती. त्या आधी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी दक्षिण भारतात घटत असलेल्या लोकसंख्येबाबत चिंता व्यक्त केली होती. ही लोकसंख्या अशीच घटत राहीली तर येणाऱ्या काळात त्याचे विपरित परिणाम होतील असंही ते म्हणाले होते. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये तरुणांची संख्या वाढत आहे असंही ते म्हणाले होते.
लोकसंख्या नियंत्रणात असली पाहीजे या विचाराचे आपण होतो, असं चंद्राबाबू नायडू म्हणाले. पण आता आपले मत बदलले पाहीजे असं ही त्यांनी सांगितलं. भारता सारख्या देशाची लोकसंख्या ही अधिक असली पाहीजे. तसे झाल्यास जगातील अन्य देश हे भारतावर अवलंबून राहातील. भारताचे भवितव्यही उज्जवल आहे. दरम्यान मातृत्व रजा वाढवण्याचा निर्णय नायडू सरकारने या आधीच घेतला आहे. त्यात आप्पाला नायडू यांनी दिलेल्या ऑफरची ही चर्चा जोरदार होत आहे.