काँग्रेसमध्ये तिकीट वाटपावरून नवा वाद? धानोरकर-पटोलेंमध्ये ठिणगी

लोकसभा निवडणूक झाल्यानंतर आता सर्वच पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी त्यांना विधानसभेची आश्वासने दिली जात आहेत.

Advertisement
Read Time: 2 mins
चंद्रपूर:

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालं. त्यात काँग्रेसचा वाटा मोठा होता. काँग्रेसने 13 जागा जिंकत मुसंडी मारली. शिवाय काँग्रेसचा एक बंडखोर उमेदवारही जिंकून आला. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मिळालेले हे यश निश्चितच पक्षाचा हुरूप वाढवणारेच आहेत. त्यामुळे आता काँग्रेसचे नेतेही जोशात आहेत. असे असताना त्यांच्यातून अशी काही वक्तव्य केली जात आहेत, की ज्या मुळे पक्षातच नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यात आता नवनिर्वाचीत खासदार प्रतिभा धानोरकर आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोल यांच्यात त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे ठिणगी पडली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

चंद्रपूर लोकसभा मतदार संघातून प्रतिभा धानोरकर यांनी दणदणीत विजय मिळवला. त्यांनी भाजपचे उमेदवार सुधिर मुनगंटीवार यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. सध्या मतदार संघात धानोरकर यांचे सत्कार सुरू आहेत. यावेळी बोलताना प्रतिभा धानोरकर यांनी चंद्रपूरमधल विधानसभा मतदार संघाता कोणाला उमेदवारी द्यायची, हे मीच ठरवणार आहे असे वक्तव्य त्यांनी केले. त्यामुळे सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. शिवाय आमदार सुभाष धोटे यांना मंत्री करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही त्या म्हणाल्या. पहिल्यादाच खासदार झालेल्या प्रतिभा धानोरकरांच्या या वक्तव्यामुळे सर्वच जण आवाक झाले आहे. विशेष म्हणजे काँग्रेसमध्ये उमेदवारी कोणाला द्यायची याचा निर्णय हायकमांड घेत असते. असे असतानाही धानोरकरांनी हे वक्तव्य का केले याची चर्चा सुरू आहे.    

Advertisement

हेही वाचा -  महायुतीत वाद पेटला! शिंदेंच्या मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टीची मागणी

खासदार प्रतिभा धानोरकरांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली आहे. त्यावर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही प्रतिक्रीया देत धानोरकरांना सुनावले आहे. तिकीट वाटपाचा अधिकार हा हायकमांडचा आहे. तो अधिकार खासदारांना नाही. खासदार हे हायकमांडकडे एखाद्या नावाची शिफारस करू शकतात. उमेदवारा बद्दल मतं ही मांडू शकतात. त्यांना उमेदवारी जाहीर करण्याचे कोणतेही अधिकार नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे. 

Advertisement

हेही वाचा -  शरद पवारांचा खासदार कुख्यात गुंडाच्या भेटीला, पुण्यात नेमकं काय झालं?

लोकसभा निवडणूक झाल्यानंतर आता सर्वच पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी त्यांना विधानसभेची आश्वासने दिली जात आहेत. लोकसभेसाठी केलेल्या कामाची पोचपावती विधानसभेत दिली जाईल असे सांगितले जात आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीत आतापासूनच जागा वाटपासाठी रस्सीखेच सुरू आहे. 

Advertisement

Topics mentioned in this article