TMC Crisis: खामोश!'पिक्चर अभी बाकी है!' शत्रुघ्न सिन्हांची बंगालच्या राजकीय भूकंपावर पहिली प्रतिक्रिया काय?

खासदार कल्याण बॅनर्जी यांनी ही अभिषेक बॅनर्जी यांच्याबाबत वक्तव्य केलं होतं.

जाहिरात
Read Time: 2 mins

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचा पराभव झाला. त्यानंतर तृणमूल काँग्रेस (TMC) मधील अंतर्गत वाद उफाळून आला आहे.  पक्षातील 60 हून अधिक आमदार फुटले आहे. शिवाय 20 हून अधिक खासदार बंडखोरीच्या तयारीत आहे. या खासदारांची एक लिस्ट ही समोर आली होती. त्या लिस्टमध्ये टीएमसीचे खासदार ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी NDTV ला दिलेल्या खास मुलाखतीत  "पिक्चर अभी बाकी है" असे म्हणत सर्वांनाच बुचकळ्यात टाकलं आहे. शिवाय आपण ममता बॅनर्जी यांच्या सोबतच असल्याचं ही त्यांनी स्पष्ट केलं आहे. 

  
शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की, मी ममता बॅनर्जी यांच्यासोबतच आहे आणि या पुढे ही राहीन. तसेच पक्षांतर्गत सुरू असलेल्या  वादावर "पिक्चर अभी बाकी है" असे म्हणत आगामी काळात मोठे राजकीय फेरबदलाचे संकेतही दिले आहेत. ​टीएमसीमधील अंतर्गत नाराजीचे मुख्य कारण अभिषेक बॅनर्जी असल्याचा आरोप होत आहे. खास करून बंडखोर नेत्यांनी अभिषेक बॅनर्जी यांच्यावरच निशाणा साधला आहे.  या पार्श्वभूमीवर बोलताना सिन्हा म्हणाले की, ममता बॅनर्जी या माझ्या एकमेव नेत्या आहेत. मी केवळ त्यांचेच ऐकतो, इतर सर्व माझे सहकारी आहेत. असं सांगत त्यांनी अभिषेक बॅनर्जी हे आपले नेते नसल्याचं स्पष्ट केलं आहे. 

नक्की वाचा - Pune News: लोणावळा परिसरात भीती, चिंता अन् धाकधूक! मान्सून आधी मळवली- देवलेवासीय का घाबरले?

खासदार कल्याण बॅनर्जी यांनी ही अभिषेक बॅनर्जी यांच्याबाबत वक्तव्य केलं होतं. शिवाय ते ही ममतांची साथ सोडणार अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यावर बोलताना त्यांनी सांगितले की, कल्याण बॅनर्जी हे अत्यंत अनुभवी नेते आहेत. त्यांनी रागाच्या भरात किंवा योग्य सन्मान न मिळाल्यामुळे काही वक्तव्य केले असेल असं सांगितलं. मात्र तेही ममता बॅनर्जी यांच्यासोबतच आहेत. ते ममता यांचे कट्टर समर्थक असल्याचं  शत्रुघ्न सिन्हा यावेळी म्हणाले. अशा वेळी सिन्हा यांनी आपण ममता बॅनर्जीं सोबत खंबीर पणे उभे असल्याचं स्पष्ट केलं आहे. विशेष म्हणजे बंडखोर खासदारांच्या यादीत  शत्रुघ्न सिन्हा यांचे ही नाव होते. 

Advertisement

नक्की वाचा - Purandar Airport: पुरंदर विमानतळ जमीन अधिग्रहणाबाबत मोठी बातमी, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला मोठा निर्णय, आता...

​दरम्यान  मोदी सरकारच्या 12 वर्षांच्या कार्यकाळानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन  शत्रुघ्न सिन्हा यांनी केले. याबाबत ही त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ही त्यांनी आपल्या स्टाईलने उत्तर दिले आहे. पंतप्रधानांचे अभिनंदन करणे हे माझे राष्ट्रीय कर्तव्य होते असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. मी नेहमीच माझ्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जातो. देशात सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषवणाऱ्या नेत्याला खिलाडूवृत्तीने शुभेच्छा देणे गैर नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. ममता बॅनर्जी या संघर्षातून उभ्या राहिलेल्या नेत्या आहेत. त्या या संकटातून नक्कीच सुखरूप बाहेर पडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.