Traditional game: लेझिम,फुगडी,लगोरी, विटी दांडूसह पारंपरिक खेळांसाठी 'क्रीडा महाकुंभ' कुठे आणि कधी?

महाराष्ट्राची थोर सांस्कृतिक परंपरा आहे. इथल्या मातीतल्या खेळातूनही या मराठी संस्कृतीचे दर्शन होते.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष पुर्ण होत आहेत. तर  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीचे औचित्य साधत, पारंपरिक खेळांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. या उद्देशाने कौशल्य विकास, रोजगार आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून क्रीडा महाकुंभ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत राज्यातील पारंपारीक खेळांचा समावेश करण्यात आला आहे. जवळपास 12 पारंपारिक खेळांचा यात समावेश असेल.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

येत्या 2 मार्च पासून 9 मार्चपर्यंत हा क्रीडा कुंभ राज्यात सुरू राहणार आहे. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या लाल मातीतले कब्बडी आणि खो-खो हे जागतिक दर्जाचे खेळ आहेत. त्याचबरोबर लगोरी, लेझिम, लंगडी, विटी दांडू सह 12 पारंपरिक खेळांचा समावेश या क्रीडा महाकुंभात करण्यात आला आहे. 2 आणि 3 मार्च रोजी आय टी आय स्तरावर, 4 आणि 5 मार्च रोजी जिल्हास्तरावर तर 7 ते 9 मार्च पर्यंत नाशिक विभागीय स्तरावर ह्या क्रीडा कुंभाची सांगता होईल. विजेत्यांना आकर्षक पारितोषिक तर सहभागी खेळाडूंना प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत.या स्पर्धेत भाग घेण्यासाठी एक क्यू आर कोड scan करावा लागणार आहे. तसेच इच्छुक खेळाडूंनी क्रीडा कुंभसाठी नियुक्त केलेले प्रभारी किंवा संबंधित आय टी आयच्या मुख्याध्यापकांकडे नोंदणी करायची आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नाममात्र 10 रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात आले आहे. ते रिफंड अर्थात पुन्हा स्पर्धकांना परत देण्यात येणार आहे. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - NCP News:'जयंत पाटलांनी आम्हाला डोळा मारला तर...' राष्ट्रवादीच्या नेत्याचे स्पष्ट संकेत

'गुंफुनी स्वदेशी खेळाची माळ, जोडूया भारतीय संस्कृतीशी नाळ' हे ब्रीद वाक्य घेऊन मंत्री लोढा यांच्या पुढाकाराने या अभिनव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तन आणि मन जोडून जागतिक स्तरावर दर्जेदार खेळाडू घडवण्यासाठी   प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2018 साली देशभरात 'खेलो  इंडिया' ही संकल्पना राबवली. या संकल्पनेच्या  आधारावर आखिल  भारतीय विद्यार्थी परिषदेने देशभरात 'खेलो भारत' ही क्रीडा मोहीम सुरू केली आहे. या अंतर्गत आता महाराष्ट्राच्या मातीत खेळल्या जाणाऱ्या पारंपरिक खेळांना पुन्हा वैभव मिळवून देण्यासाठी अभिनव उपक्रम सुरू केला आहे.

ट्रेंडिंग बातमी - Crime News: आधी अत्याचार केले मग गर्भपाताच्या गोळ्या दिल्या, अल्पवयीन मुली बरोबर शेजाऱ्यानेच...

महाराष्ट्राची थोर सांस्कृतिक परंपरा आहे. इथल्या मातीतल्या खेळातूनही या मराठी संस्कृतीचे दर्शन होते. त्याचबरोबर शिवकालीन इतिहास खेळाच्या माध्यमाने नव्या पिढीला कळावा यासाठी पावनखिंड दौड या खेळाचा समावेशही या स्पर्धेत करण्यात आला आहे. या क्रीडा महाकुंभात दंड बैठक, लेझिम, पंजा लढवणे, रस्सी खेच, लंगडी, दोरीवरच्या उड्या, कब्बडी, फुगडी, खो खो,  विटी दांडू आणि लगोरी या पारंपरिक खेळांचा समावेश करण्यात आला आहे. महिला आणि पुरुष दोन्ही गटात या स्पर्धा खेळवल्या जाणार आहेत. कौशल्य विकास विभागांतर्गत येणारे  व्यवसाय प्रशिक्षण आणि संचालनालय आणि पुणे येथील क्रीडा भारती या संस्थेच्या सहयोगाने या क्रीडा महाकुंभाचे आयोजन करण्यात आले आहे. 

Advertisement