वाल्मिक कराड भोवती आता फास आवळत चालला आहे. खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. त्यानंतर त्याच्याकडून जामीनासाठी अर्ज केला आहे. त्याच वेळी त्याला मोक्का लावला गेला आहे. दुसरीकडे संतोष देशमुख हत्ये प्रकरणीही त्याचा ताबा घेतला जाणार आहे. त्यामुळे वाल्मिकच्या अडचणीत वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर आता वाल्मिकची पत्नी आणि आई मैदानात उतरल्या आहेत. त्यांनी परळी पोलिस स्टेशनच्या बाहेर ठिय्या आंदोलन करत वाल्मिक कराड विरोधात जे खोटे गुन्हे दाखल केले आहेत ते मागे घ्यावे अशी मागणी केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पारुबाई कराड या वाल्मिक कराडच्या आई आहेत. त्यांचे वय झाले आहेत. अनेक आजारांनी त्या ग्रस्त असतात. एका जागेवर त्यांना बसता येत नाही. त्यांनी गुडघ्याचा त्रासही होतो. अशा स्थितीत त्या आपल्या मुलासाठी सकाळी सकाळी परळी पोलिस्थानका बाहेर आल्या. त्यांनी तिथे ठिय्या आंदोलन केलं. माझ्या लेकाची सुटका करा. त्याच्या विरोधातले सगळे गुन्हे खोटे आहेत. त्याला राजकारणाचा बळी केला जात आहे. माझ्या मुलावर अन्याय होत आहे असं त्या म्हणाल्या. वेगवेगळ्या प्रकरणात त्याला गुंतवलं जात आहे असंही त्या म्हणाल्या. वाल्मिकच्या आई बरोबर त्याचे समर्थकही पोलिस स्थानका बाहेर जमा झाले होते.
वाल्मिक याची पत्नी मांजली कराड याही पोलिस स्थानका बाहेर ठिय्या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. माझ्या पती विरोधात जे आरोप लावले ते मागे घ्यावेत. त्यांच्यावर केलेले आरोप हे बिनबुडाचे आरोप आहेत. खोटे आरोप आहेत. लोकाच्या सांगण्यावरून आणि लोकाच्या आंदोलनावरून सरकारला वेठीस धरलं जात आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. दबावाखाली हे गुन्हे नोंदवले गेले आहेत. जे आरोप केले जात आहेत ते थांबवले गेले पाहीजेत. प्रकरण न्यायालयात आहे, असं ही त्या म्हणाल्या.
वाल्मिक कराडचे समर्थक एकीकडे त्याच्या सुटकेसाठी रस्त्यावर उतरले आहे. आई पत्नी पोलिस स्थानकात ठिय्या देत आहेत. तर दुसरीकडे वाल्मिकच्या गळ्या भोवती फास आवळत चालला आहे. खंडणी प्रकणी त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. त्यामुळे त्याच्या जामीनाचा मार्ग मोकळा झाला आहे. जामीनासाठी अर्ज करणार असल्याचेही त्याच्या वकीलांनी स्पष्ट केले आहे. अशात त्याच्या विरोधात मोक्का लावला गेला आहे. शिवाय संतोष देशमुख हत्या प्रकरणातही त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे.