संसदेतील पहिल्या भाषणात प्रियांका गांधींनी वापरला M3 फॉर्म्युला ! काय आहे काँग्रेसचा नवा प्लान?

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

Priyanka Gandhi First Speech In Parliament:  काँग्रेसच्या वायनाडच्या खासदार प्रियांका गांधी- वाड्रा यांनी लोकसभेत पहिल्यांदाच भाषण केलं. हे पहिलं भाषण संस्मरणीय ठरण्यासाठी त्यांनी जोरदार तयारी केली होती. त्यांनी या भाषणात भाजपावर जोरदार हल्ला केला. प्रियांका यांनी यावेळी M3 फॉर्म्युल्यावर फोकस केला. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

पहिला M

प्रियांका गांधी यांच्या M मधील पहिला M आहे महिला. प्रियांका यांनी त्यांच्या भाषणात महिलांवर फोकस केला. त्यांनी सांगितलं की, 'निवडणुकीचमुळे कदाचित नारी शक्तीबाबत बोललं जातंय. संविधानानं त्यांना हा अधिकार दिलाय. नारी शक्ती अधिनियम लागू का केला जात नाही? आजच्या महिला 10 वर्ष हा कायदा लागू करण्याची वाट पाहणार का? येथील सहकारी अनेकदा जुनी उदाहरणं देतात. यावर्षी हे झालं... त्यावर्षी हे झालं.. तुम्ही काय करत आहात? सर्व गोष्टी नेहरुजींनीही केल्या आहेत का? सर्व जबाबदारी नेहरुंची आहे का? असा प्रश्न त्यांनी विचारला.

Advertisement

( नक्की वाचा :  राहुल गांधींशी कनेक्शन असल्याचा आरोप असलेले George Soros कोण आहेत? )

    दुसरा M

    प्रियांका गांधींच्या भाषणातील दुसरा M आहे मुस्लीम. सध्या संशय आणि तिरस्काराचं बीजारोपण केलं जात आहे, असा आरोप त्यांनी केला. संभल, मणीपूर, हाथरसबाबत कुणी बोलत नाही. भारताच्या संविधानानं एकता दिली आहे. तुम्हाला 'मोहब्बत की दुकान' वर हसू येतं, पण देश त्याच्यासबोत होता. 

    Advertisement

    प्रियांका पुढे म्हणाल्या, 'संभलमधील पीडित कुटुंबातील काही जण आम्हाला भेटायला आले होते. त्यामध्ये अदनान आणि उजैर दोन मुलं होती. त्यापैकी एक माझ्या मुलाच्या वयाचा होता. तर दुसरा लहान होता, 17 वर्षांचा. त्यांचे वडील टेलर होते. त्यांचं मुलांना शिक्षण देणं हे एकच स्वप्न होतं. एक मुलगा डॉक्टर बनेल, दुसरा देखील यशस्वी होईल, हे त्यांचं स्वप्न होतं. पोलिसांनी त्यांच्या वडिलांची गोळ्या झाडून हत्या केली. मला मोठं होऊन डॉक्टर व्हायचं आहे, असं 17 वर्षांच्या अदनाननं मला सांगितलं. त्याला वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. हे स्वप्न आणि आशा त्याच्या मनात भारतीय संविधानानं दिली आहे.'

    Advertisement

    ( नक्की वाचा :  INDIA मधील राहुल गांधींची जागा धोक्यात, ममतांच्या खांद्यावरुन लालूंची फायरिंग )

    तिसरा M

    प्रियांका गांधी यांच्या भाषणातील तिसरा M आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी. प्रियांका यांनी पंतप्रधान मोदींवर टीका करताना एक गोष्ट सांगितली. त्या म्हणाल्या, 'आम्ही ऐकलंय एक राजा आपल्या प्रजेचं दु:ख बदलण्यासाठी वेषांतर करतो. आजही वेषांतर केलं जात आहे, पण लोकांचं दु:ख पाहिलं जात नाही.'

    काँग्रेसेचा प्लान काय?

    प्रियांका गांधी यांना भाषणात M3 फॉर्म्युला वापरण्याची वेळ का आली हे समजून घेऊया. सोनिया गांधींच्या काळात महिला मतदारांचा कल काँग्रेसकडं होता. पण, नरेंद्र मोदींच्या उदयानंतर देशातील महिला व्होटबँक भाजपाकडं झुकली आहे. त्यामुळेच अनेक प्रयत्न करुनही मागील तीन लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला शंभरी गाठण्यातही अपयश आलंय.  

    काँग्रेससाठी दुसरा M म्हणजेत मुस्लीम हा अतिशय महत्त्वाचा फॅक्टर आहे. मुस्लीम मतदार सध्या काँग्रेसच्या बाजूनं भक्कमपणे उभे आहेत. त्यामुळेच अखिलेश यादव ते अरविंद केजरीवालपर्यंत I.N.D.I.A. आघाडीचे नेते काँग्रेसपासून अंतर ठेवून ममता बॅनर्जींनी या आघाडीचं नेतृत्त्व करावं ही मागणी करत आहेत. 

    तर, राहुल गांधींप्रमाणेच आपलेही लक्ष पंतप्रधान मोदी असतील. त्यांच्यावर टीका करण्याची एकही संधी आपण सोडणार नाही, हे तिसऱ्या M च्या माध्यमातून प्रियांका यांनी स्पष्ट केलंय.