Election results 2024 : कधी आणि कुठे पाहणार हरियाणा आणि जम्मू काश्मीरचे निकाल? वाचा सर्व माहिती

Haryana and Jammu Kashmir Election Results : हरियाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभा निवडणूक निकालांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Assembly Election Results 2024 : हरयाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकांचे निकाल मंगळवारी (8 ऑक्टोबर) लागणार आहेत.
मुंबई:

Election results 2024 : हरियाणा आणि जम्मू काश्मीर या उत्तर भारतामधील दोन राज्यांमधील विधानसभा निवडणूक पूर्ण झाली आहे. जम्मू काश्मीरमध्ये तीन तर हरियणामध्ये एका टप्प्यात मतदान झालं. नरेंद्र मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तेमध्ये आल्यानंतर देशात पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका झाल्या आहेत. त्याचबरोबर जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 रद्द झाल्यानंतर होणाऱ्या या पहिल्याच विधानसभा निवडणुका आहेत. त्यामुळे या निवडणुकांना विशेष महत्त्व आहे. आता निवडणूक निकालानंतर मतमोजणी कधी होणार आणि या राज्यांमध्ये कुणाचं सरकार होणार याची उत्सुता शिगेला पोहचली आहे.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

कधी होणार मतमोजणी?

हरियाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकांची मतमोजणी आज (8 ऑक्टोबर 2024) होणार आहे. सकाळी 8 वाजल्यापासून ही मतमोजणी सुरु होईल. मतमोजणी सुरु झाल्यानंतर लगेच कल समजू लागतील. तर दुपारपर्यंत संपूर्ण चित्र स्पष्ट होईल.

किती जागांवर होणार मतमोजणी?

हरियाणा आणि जम्मू काश्मीर या दोन्ही विधानसभेसाठी प्रत्येकी 90 जागांवर मतमोजणी होणार आहे. विधानसभेतील बहुमतासाठी 46 हा जादुई आकडा आहे. हरियणामध्ये भारतीय जनता पार्टी (भाजपा) आणि काँग्रेस यांच्यात मुख्य लढत होत आहे. तर जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्स आघाडी, पीपल्स डेमॉक्रेटीक पार्टी (PDP) आणि भाजपा अशी तिरंगी लढत आहे. सर्वच प्रमुख पक्षांनी आपल्यालाच बहुमत मिळेल असा दावा केला आहे.

यापूर्वी कुणाचं होतं सरकार?

हरियाणामध्ये गेल्या 10 वर्षांपासून भाजपाचं सरकार आहे. तर जम्मू काश्मीरमध्ये 2015 साली यापूर्वी विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. या निवडणुकीनंतर भाजपा आणि पीडीपी पक्षानं आघाडी केली. या आघाडीच्ये नेत्या मेहबूबा मुफ्ती मुख्यमंत्री होत्या.

Advertisement

भाजपानं पाठिंबा काढून घेतल्यानंतर मुफ्ती यांचं सरकार कोसळलं. त्यानंतर 2019 साली जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केला. जम्मू काश्मीरमध्ये सध्या राष्ट्रपती राजवट आहे.

एग्झिट पोलचा अंदाज काय?

एग्झिट पोलच्या अंदाजानुसार हरियाणामध्ये 10 वर्षांनंतर काँग्रेसचं सत्तेत पुनरागमन होणार आहे. राज्यात काँग्रेसला बंपर बहुमत मिळेल असा अंदाज एग्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आला आहे. सर्व एग्झिट पोलच्या आधारावर तयार करण्यात आलेल्या NDTV च्या 'पोल्स ऑफ पोल'नुसार हरियाणामध्ये भाजपाला 24, काँग्रेसला 55 आणि जेजेपी पक्षाला 1 जागा मिळण्याचा अंदाज आहे. 

Advertisement

( नक्की वाचा : Haryana Exit Poll Result : हरयाणामध्ये काँग्रेसचं पुनरागमन, एक्झिट पोलमध्ये बंपर बहुमत )
 

जम्मू काश्मीरमध्ये मात्र त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येईल, असा अंदाज एग्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आला आहे. काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्स यांच्या आघाडीला सर्वाधिक जागा मिळतील, असाच सर्व एग्झिट पोलचा अंदाज आहे. 

 NDTV च्या 'पोल्स ऑफ पोल'नुसार जम्मू काश्मीरमध्ये भाजपाला 27, काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्स आघाडीला 42, पीडीपीला 7 आणि इतर पक्षांना 14 जागा मिळतील, असा अंदाज आहे.

( नक्की वाचा : J & K Exit Poll : जम्मू काश्मीरमध्ये 10 वर्षांनी झाल्या विधानसभा निवडणुका, एक्झिट पोलचा अंदाज काय? )
 

कुठे पाहणार ऑनलाईन निकाल?

हरियाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीचे निकालांचे सर्व अपडेट्स आणि विश्लेषण ऑनलाईन पाहण्यासाठी तुम्ही www.marathi.ndtv.com या 'NDTV मराठी'च्या वेबसाईटवर वाचू शकता. हे विश्लेषण पाहण्यासाठी 'NDTV मराठी'चं You चॅनेलही क्लिक करा. मंगळवारी दिवसभर तुम्हाला याबाबतचे सर्व अपडेट्स आणि निकालाचं विश्लेषण NDTV मराठीच्या वेबसाईटवर वाचायला तसंच यूट्यूब चॅनेलवर पाहायला मिळेल. 

Advertisement