Asia Cup Trophy Row: विराट कोहलीचा 'खास दोस्त' पाकिस्तानच्या बाजूने! टीम इंडियाला सुनावले, 'खेळात राजकारण नको'

Asia Cup Trophy Row: : आशिया चषक 2025 च्या फायनलनंतर निर्माण झालेल्या वादाचे पडसाद क्रिकेट विश्वात अजूनही उमटत आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
Asia Cup Trophy Row: आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) प्रमुख आणि पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसीन नक्वी यांच्या हस्ते विजेतेपदाची ट्रॉफी स्वीकारण्यास भारताने नकार दिला.
मुंबई:

Asia Cup Trophy Row: : आशिया चषक 2025 च्या फायनलनंतर निर्माण झालेल्या वादाचे पडसाद क्रिकेट विश्वात अजूनही उमटत आहेत. आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) प्रमुख आणि पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी (Mohsin Naqvi) यांच्या हस्ते विजेतेपदाची ट्रॉफी स्वीकारण्यास भारताने नकार दिला. त्यानंतर मोहसीन नक्वी ट्रॉफी आणि मेडल भारतीय खेळाडूंना न सोपवताच घेऊन गेले.

पाकिस्तानी अधिकाऱ्याच्या आडमुठ्या धोरणामुळे  फायनल मॅच जिंकलेल्या भारतीय टीमला त्या दिवशी ट्रॉफी मिळू शकली नाही. त्याबद्दल नक्वी यांच्यावर जोरदार टीका होत आहे. त्याचवेळी महान क्रिकेटपटू, आरसीबीचा माजी खेळाडू आणि विशेष म्हणजे विराट कोहलीचा जवळचा मित्र अशी ओळख असलेल्या एबी डिव्हिलियर्सने (AB de Villiers)  या प्रकरणात भारतावरच टीका केलीय. 

( नक्की वाचा : Mohsin Naqvi: मोहसीन नक्वींनी एशिया कपची ट्रॉफी यूएई क्रिकेट बोर्डाकडे सोपवली; टीम इंडियाला कधी मिळणार? )
 

का झाला नाराज?

डिव्हिलियर्सने त्याच्या  यूट्यूब चॅनेलवरील व्हिडिओमध्ये या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. फायनलमध्ये भारताने पाकिस्तानचा 5 विकेट्सनं पराभव केल्यानंतर हा सर्व प्रकार घडला. "टीम इंडिया ट्रॉफी देणाऱ्या व्यक्तीमुळे समाधानी नव्हती. मला वाटतं, याचा खेळाशी काही संबंध नाही. राजकारण खेळापासून दूर ठेवलं पाहिजे. खेळ ही एक वेगळी गोष्ट आहे आणि तो त्याच भावनेने साजरा केला जावा," असे मत त्याने व्यक्त केले.

तो पुढे म्हणाला, "हे पाहून मला खूप वाईट वाटले, पण भविष्यात ते या गोष्टी सोडवतील अशी आशा आहे. हे सर्व खेळाडूंना, क्रिकेटपटूंना खूप कठीण परिस्थितीत आणते आणि हेच मला नको आहे. शेवटी हे सर्व खूप ऑकवर्ड होतं."

Advertisement

नक्वी यांनी ट्रॉफी नेली हॉटेलमध्ये

भारतीय संघाच्या या भूमिकेमुळे संतप्त झालेले मोहसिन नक्वी यांनी टीम इंडियाला ट्रॉफी देण्यास नकार दिला. सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखालील संघाला ट्रॉफी न देता, नक्वी ती आणि विजेत्यांची पदके घेऊन आपल्या दुबईतील हॉटेल रूममध्ये गेले होते.

टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची प्रशंसा

राजकीय वादावर टीका करतानाच, डिव्हिलियर्सने पुढील वर्षी होणाऱ्या टी20 वर्ल्ड कप (T20 World Cup) च्या पार्श्वभूमीवर टीम इंडियाच्या तयारीचे कौतुक केले.

Advertisement

"सर्वात महत्त्वाच्या गोष्टीवर (क्रिकेटवर) लक्ष केंद्रित करूया. टी20 वर्ल्ड कप जवळ येत असताना भारत खूप मजबूत दिसत आहे. त्यांच्याकडे भरपूर प्रतिभा आहे आणि ते मोठ्या क्षणांमध्येही चांगली कामगिरी करतात. त्यामुळे (त्यांना खेळताना पाहणे) शानदार आहे," असेही डिव्हिलियर्सने शेवटी सांगितले. 
 

Topics mentioned in this article