T-20 WC : अफगाणिस्तानने इतिहास रचला, ऑस्ट्रेलियाचा दणदणीत पराभव

भारतात झालेल्या विश्वचषकातील पराभवाचा बदलाही घेतला. या पराभवामुळे सेमिफायनल मध्ये जाण्याच्या ऑस्ट्रेलियाच्या स्वप्नांना ब्रेक लागू शकतो. तर अफगाणीस्तान साठी मोठी संधी चालून आली आहे

जाहिरात
Read Time: 2 mins

टी-20 विश्वचषकात मोठा उलटफेर  पाहायला मिळाला. अफगाणिस्थान संघाने धक्कादायक विजयाची नोंद करत बलाढ्य ऑस्ट्रेलियाला पराभवाची धुळ चारली. शिवाय भारतात झालेल्या विश्वचषकातील पराभवाचा बदलाही घेतला. या पराभवामुळे सेमिफायनल मध्ये जाण्याच्या ऑस्ट्रेलियाच्या स्वप्नांना ब्रेक लागू शकतो. तर अफगाणीस्तान साठी मोठी संधी चालून आली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

अफगाणिस्तानची प्रथम फलंदाजी 

अफगाणिस्तानसाठी आजचा सामना महत्वाचा होता. भारता बरोबर पराभव स्विकारावा लागल्यानंतर, उपात्य फेरीत प्रवेश करण्यासाठी अफगाणिस्तानला ऑस्ट्रेलिया बरोबर विजय आवश्यक होता. त्या उद्देशाने राशिद खानच्या नेतृत्वाखालील संघ मैदानात उतरला.  ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकत पहिले बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. अफगाणिस्तानच्या रहमानुल्लाह गुरबाज आणि इब्राहिम जादरान यांनी डावाची दमदार सुरूवात केली.या दोघांनी 10 ओव्हर्समध्ये 64 धावांची सलामी दिली. गुरबाज ने  49 बॉलमध्ये 69 धावा काढत बाद झाला. तर दुसरा ओपनर इब्राहिम जादरान  यानेही 51 धावा केल्या. त्यानंतर तो बाद झाला. त्यानंतर एकामागोमाग सहा विकेट अफगाणिस्तानने गमावल्या. संघाला 20 ओव्हरमध्ये 148 धावा करता आल्या. पॅट कमिन्सने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलिया समोर 149 धावांचे लक्ष ठेवले.

Advertisement

ट्रेंडिंग बातमी -  T-20 WC : बांगलादेशी वाघ टीम इंडियासमोर हतबल, भारताने ५० धावांनी जिंकला सामना

ऑस्ट्रेलियाची अडखळत सुरूवात 

148 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरूवात खराब झाली. सुरूवातीलाच अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाला दोन झटके दिले. नवीन उल हक ने ट्रेविस हेड आणि मार्श आउट केले. पहिल्या पाच षटकातच ऑस्ट्रेलियाच्या दोन विकेट गेल्या होत्या. त्यानंतर डेव्हिड वॉर्नरही तंबूत परतला. त्यानंतर मॅक्सवेलने एक बाजू लावून धरली. तो अफगाण गोलंदाजांचा समर्थपणे सामना करत होता. पुन्हा त्यांनी अफगाणीस्तानचा विजय हिरावून घेतल्याची स्थिती होती.

Advertisement

सामना रोमांचक स्थितीत 

शेवटच्या 36 चेंडूत  44 धावांची ऑस्ट्रेलियाला गरज होती. त्यावेळी मॅक्सवेल मैदानात होता. मात्र मॅक्सवेल आणि मॅथ्यू वेडला बाद करण्यात अफगाणीस्तानला यश आलं. त्यानंतर सामना रोमांचक झाला. शेवटच्या 12 चेंडू मध्ये ऑस्ट्रेलियाला 33 धावांची गरज  होती. तर त्यांच्या दोन विकेटही बाकी होती. पण अफगाण गोलंदाजांनी कमाल केली. ऑस्ट्रेलियाचा ऑल आऊट करत सामना 21 धावांनी जिंकला.  

Advertisement

वन डे वर्ल्डकपच्या पराभवाचा घेतला बदला 

भारतात झालेल्या वने डे वर्ल्डकपचा बदला अफगाणीस्तानने घेतला आहे. विश्वचषकातील विजयाचा घास ऑस्ट्रेलियाने हिरावला होता. त्यावेळीही मॅक्सवेलने एकहाती विजय मिळवून दिला होता. यावेळीही मॅक्सवेल अफगाणीस्तानचा खेळ खराब करणार अशी स्थिती होती. मात्र ऐन वेळी त्याला आऊट करण्यात यश आले. त्यामुळे अफगाणीस्तानने ऐतिहासिक विजयाची नोंद केली. या विजया मुळे उपांत्य फेरीत जाण्याच्या अफगाणीस्तानच्या आशा पल्लवीत झाल्या आहे. तर ऑस्ट्रेलियाच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहे. त्यांना उपांत्य फेरीत जायचे असेल तर भारता विरुद्धचा सामना जिंकावा लागेल. तर अफगाणीस्तानलाही बांगलादेशवर विजय मिळवणे आवश्यक आहे.