Amit Mishra: 25 वर्षांच्या प्रवासानंतर अमित मिश्राचा निवृत्तीचा निर्णय; नावावर आहे भयंकर दुर्मीळ रेकॉर्ड

Amit Mishra Retirement: टीम इंडियाचा अनुभवी लेग स्पिनर अमित मिश्राने अखेर 25 वर्षांच्या  क्रिकेट कारकिर्दीला पूर्णविराम दिला आहे

जाहिरात
Read Time: 2 mins
Amit Mishra Retirement: अमित मिश्रा 2003 मध्ये पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.
मुंबई:

Amit Mishra Retirement: टीम इंडियाचा अनुभवी लेग स्पिनर अमित मिश्राने अखेर 25 वर्षांच्या  क्रिकेट कारकिर्दीला पूर्णविराम दिला आहे. त्याने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. 42 वर्षीय स्पिनरने देशासाठी आपला पहिला सामना 13 एप्रिल 2003 रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे फॉरमॅटमध्ये खेळला होता.

अमित मिश्राची आंतरराष्ट्रीय कारकिर्द

अमित मिश्राला टीम इंडियात जास्त संधी मिळाली नाही. पण जेव्हा त्याला कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली, त्यावेळी त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मिश्रा टीम इंडियाकडून 68 आंतरराष्ट्रीय सामने खेळला. त्यामधील 84 इनिंगमध्ये त्यानं 156 विकेट्स घेतल्या. 

अमित मिश्राने 22 टेस्टमधील 40 इनिंगमध्ये 35.72 च्या सरासरीने 76, 36 वनडेमधील 34 इनिंगमध्ये 23.63 च्या सरासरीने 64 आणि T20 मध्ये 10 सामने खेळताना 10 इनिंगमध्ये 15.0 च्या सरासरीने 16 विकेट्स घेतल्या.

( नक्की वाचा : MS Dhoni : 'कॅप्टन कूल' धोनीनं भर मैदानात मला शिव्या दिल्या...,' CSK च्या माजी खेळाडूनं सांगितली Untold Story )
 

बॅटिंगमध्येही योगदान

अमित मिश्रा बॅटनंही वेळोवेळी उपयुक्त योगदान दिलं. त्याने रेड बॉल क्रिकेटमध्ये अनेक वेळा त्याच्या बॅटिंगची चमक दाखवली. टीमसाठी त्याने 22 टेस्टमधील 32 इनिंगमध्ये 21.6 च्या सरासरीने 648 रन्स केल्या. यात 4 हाफ सेंच्युरींचा समावेश आहे.

Advertisement

न मोडता येणारा रेकॉर्ड

अमित मिश्रानं आयपीएलमध्ये नेहमीच दमदार कामगिरी केली. IPL मध्ये सर्वाधिक हॅटट्रिक घेण्याचा रेकॉर्ड त्याच्या नावावर आहे. मिश्राने आयपीएलमध्ये 3 हॅटट्रिक घेतल्या आहेत. विशेष म्हणजे त्यानं या तीन्ही हॅटट्रिक वेगवेगळ्या टीमकडून घेतल्या.  2008 मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स, 2011 मध्ये डेक्कन चार्जर्स आणि 2013 मध्ये सनरायझर्स हैदराबादसाठी खेळताना त्याने हा रेकॉर्ड केला. आयपीएल इतिहासातील हा एक दुर्मीळ रेकॉर्ड आहे. जो मोडणे जवळपास अशक्य आहे. 

अमित मिश्रा आयीएलमध्ये एकूण 162 मॅच खेळला. त्यामध्ये त्यानं 23.82 च्या सरासरीने 174 विकेट्स घेतल्या. 

Topics mentioned in this article