Arjun Tendulkar: मुंबई इंडियन्सशी रक्ताचं नातं, तरीही अर्जुननं का सोडली साथ? पहिल्यांदाच सांगितलं कारण

Arjun Tendulkar : सचिन तेंडुलकरचा मुलगा म्हणून मिळालेली ओळख आणि मुंबई इंडियन्सशी असलेलं रक्ताचं नातं मागे सारून अर्जुन तेंडुलकरनं आता एका नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Arjun Tendulkar : अर्जुन तेंडुलकरचं मुंबई इंडियन्सशी सचिनपासून नातं होतं.
मुंबई:

Arjun Tendulkar Breaks Silence on Leaving Mumbai Indians: सचिन तेंडुलकरचा मुलगा म्हणून मिळालेली ओळख आणि मुंबई इंडियन्सशी असलेलं रक्ताचं नातं मागे सारून अर्जुन तेंडुलकरनं आता एका नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. अर्जुन आयपीएल 2026 मध्ये लखनौ सुपर जायंट्सकडून खेळणार आहे.  मात्र, वर्षानुवर्षे ज्या मुंबई इंडियन्सचा तो भाग होता, ती टीम त्यानं नेमकी का सोडली? या प्रश्नाचं उत्तर त्यानं पहिल्यांदाच अत्यंत स्पष्टपणे दिलं आहे. त्याच्या या खुलाशानं क्रिकेट वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

हे कुणालाच आवडत नाही

अर्जुन तेंडुलकरला मुंबई इंडियन्सने 2021 मध्ये 20 लाख रुपयांना आपल्या संघात सामील करून घेतले होते. मात्र, दुखापत आणि संघातील तीव्र स्पर्धेमुळे त्याला सुरुवातीची दोन वर्षे मैदानावर उतरण्याची संधीच मिळाली नाही. 2023 मध्ये त्याने पदार्पण केले खरे, पण त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये कायमस्वरूपी स्थान मिळवता आले नाही. 

Advertisement

याच मुद्द्यावर बोलताना अर्जुन म्हणाला की, बेंचवर बसून राहणे कोणालाच आवडत नाही. प्रत्येक खेळाडूला मैदानात उतरून आपली कामगिरी दाखवायची असते. तुम्हाला सातत्याने संधी मिळत नाही, तेव्हा प्रगती खुंटते.

( नक्की वाचा : Yograj Singh :'दाढी कापून फेकेन, पण त्याला नंबर 1 बनवेन'; अर्जुन तेंडुलकरवरून योगराज सिंग यांनी अश्विनला झापलं )

अर्जुनचा नवा अध्याय

मुंबई इंडियन्सचा निरोप घेतल्यानंतर अर्जुन आता लखनौ सुपर जायंट्सकडून खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. लखनौ आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्यापूर्वी अर्जुनने आपल्या भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला की, प्रत्येकाला कष्ट करायचे असतात आणि संधी मिळाल्यावर स्वतःला सिद्ध करायचे असते. 

सचिन तेंडुलकरचा मुलगा असल्यामुळे त्याच्यावर नेहमीच अपेक्षांचे ओझे असते, मात्र आता लखनौच्या संघात त्याला अधिक मॅचेस खेळायला मिळण्याची शक्यता आहे. जस्टिन लँगर यांच्या मार्गदर्शनाखाली अर्जुन आपल्या करिअरला नवी दिशा देण्यासाठी उत्सुक आहे.

Advertisement

अर्जुनसमोर मोठं आव्हान

अर्जुन आता 26 वर्षांचा झाला आहे. डावखुरा फास्ट बॉलर म्हणून त्याच्याकडे चेंडू दोन्ही बाजूंनी स्विंग करण्याची क्षमता आहे. मुंबई इंडियन्समध्ये असताना त्याला हव्या तितक्या संधी मिळाल्या नाहीत, ही खंत त्यानं व्यक्क केली आहे. आता लखनौच्या टीममध्ये त्याला स्वतःचे स्थान पक्के करावे लागेल. 

वडिलांचा वारसा चालवतानाच स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी अर्जुनसाठी हा हंगाम 'करा किंवा मरा' असा असणार आहे. लखनौच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याला कधी जागा मिळते आणि तो आपल्या कामगिरीने टीकाकारांना उत्तर देतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 

Advertisement
Topics mentioned in this article