तो कोळसा आहे! अर्जुन तेंडुलकरवर माजी क्रिकेटपटू आणि अभिनेत्याची सडकून टीका

अर्जुन तेंडुलकर याने आयपीएलचे काही सामने खेळले असून त्यातही त्याला फार चमक दाखवता आलेली नाही.

Advertisement
Read Time: 2 mins
नवी दिल्ली:

भारताचा दिग्गज फलंदाज, माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर हा क्रिकेटविश्वात स्थिरावण्यासाठी धडपड करतोय. अर्जुन तेंडुलकरपेक्षा जास्त चांगले क्रिकेटपटू हे संधीच्या शोधात असताना अर्जुनला इतक्या संधी कशा मिळतात असा सवाल क्रिकेटप्रेमी सतत विचारत असतात. अर्जुन तेंडुलकर याने आयपीएलचे काही सामने खेळले असून त्यातही त्याला फार चमक दाखवता आलेली नाही. अर्जुन तेंडुलकर हा सातत्याने टीकेचे लक्ष्य होऊ लागला असून त्याची हुर्यो उडवली जाऊ लागली आहे. एका माजी क्रिकेटपटू आणि अभिनेत्याने अर्जुन तेंडुलकरवर तोंडसुख घेतले असून त्याला या अभिनेत्याने 'कोळसा' म्हटलं आहे.यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

माजी क्रिकेटपटू युवराज सिंहचे वडील योगराज सिंह हे आपल्या बडबडीमुळे सातत्याने वादात सापडलेले असतात. यापूर्वी त्यांनी भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीवरही अनेकदा टीका केली आहे. आता त्यांनी अर्जुन तेंडुलकरवर टीका करायला सुरुवात केली आहे. अर्जुनने योगराज सिंह यांच्याकडून काही धडे गिरवण्यासाठी त्यांना विनंती केली होती. योगराज यांनी त्याला मार्गदर्शनही केले आहे. मात्र योगराज यांना अर्जुनचे क्रिकेट कौशल्य सुमार दर्जाचे असल्याचे वाटत असल्याचे त्यांच्या टीकेवरून वाटू लागले आहे.

हे ही वाचा : राहुल द्रविडसाठी आनंदाची मोठी बातमी, मुलाने पूर्ण केले वडिलांचे स्वप्न

योगराज यांना एका मुलाखतीमध्ये अर्जुनच्या कौशल्याबद्दल विचारण्यात आले होते. यावर त्यांनी म्हटले की, ""कोळशाच्या खाणीत तुम्हाला कधी हिरा सापडतो का ? तो कोळसा आहे" योगराज यांनी अर्जुनचा कोळसा म्हणून उल्लेख करत त्याला हिणवणं काहींना आवडलंय  तर काहींना आवडलेलं नाही. योगराज यांचे विधान न आवडलेल्यांनी म्हटलंय की योगराज यांनी फारच कडक शब्दात ही टीका केली आहे. काहींनी योगराज यांचे समर्थन करताना म्हटलंय की ते प्रशिक्षक असून त्यांना यावर बोलण्याचा अधिकार आहे. 

हे ही वाचा : 'जग तुझ्यावर थुंकेल', कपिल देवबद्दल काय म्हणाले युवराजचे वडील?

योगराज सिंह यांनी धोनीवर सातत्याने आरोप केले आहेत. युवराज सिंह हा योगराज सिंह यांचा मुलगा असून धोनीमुळे आपल्या मुलावर सतत अन्याय झाला अशी टीका योगराज यांनी केली आहे.  यावर युवराजने काही दिवसांपूर्वी मौन सोडताना आपल्या वडिलांना मानसिक आजार झाल्याचे म्हटले होते.  आपले वडील मानसिक आजार झाल्याचे कबूल करायला तयार नसल्याचेही त्याने म्हटले आहे.  युवराज सिंहने 17 वर्ष भारतीय संघासाठी क्रिकेट खेळले असून त्याने 2007 च्या T20 वर्ल्ड कप आणि 2011च्या  एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आहे.  टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Advertisement