Abhishek Sharma RECORD: टीम इंडियामध्ये आशिया चषक 2025 (Asia Cup 2025) मध्ये यूएई विरुद्धच्या (India vs United Arab Emirates, 2nd Match) विजयाने दमदार सुरुवात केली आहे. या विजयासह, भारताने टी-20 फॉरमॅटमध्ये खेळल्या जाणाऱ्या आशिया चषकात सर्वात मोठा विजय नोंदवला आहे. यूएईने टीम इंडियाला विजयासाठी 58 रन्सचे लक्ष्य दिले होते. अभिषेक शर्मा, शुभमन गिल आणि सूर्यकुमार यादव यांच्या दमदार बॅटिंगच्या जोरावर भारतीय टीमनं 4.3 ओव्हर्समध्ये 1 विकेट गमावून 60 रन्स केले आणि 9 विकेट्स राखून सामना जिंकला. (Abhishek Sharma Creates T20I History)
अभिषेक शर्माचा नवा रेकॉर्ड
या सामन्यात भारताचा सलामीवीर अभिषेक शर्माने (ABHISHEK SHARMA HIT A SIX IN THE FIRST BALL) इतिहास घडवला. अभिषेकने भारताच्या डावाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारण्याचा पराक्रम केला. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात टार्गेटचा पाठलाग करताना पहिल्याच बॉलवर सिक्स मारणारा अभिषेक पहिला भारतीय बॅटर ठरला आहे. यापूर्वी कोणत्याही भारतीयाने हा पराक्रम केला नव्हता. (Abhishek Sharma reccord T20I History)
यासोबतच 500+ टी20I रन्स करणाऱ्या फलंदाजांमध्ये अभिषेक शर्माचा स्ट्राइक रेट सर्वाधिक आहे. आतापर्यंत, अभिषेकने 16 इनिंगमध्ये एकूण 535 रन्स केले आहेत, ज्यात त्याचा स्ट्राइक रेट 193.84 आहे. अभिषेकने आतापर्यंत दोन सेंच्युरी आणि दोन हाफ सेंच्युरी झळकावली आहेत. (Abhishek Sharma's strike rate is the highest among batters with 500+ T20I runs)
( नक्की वाचा : IND vs UAE: सूर्यकुमार यादवची 'खिलाडूवृत्ती', टॉवेलमुळे आऊट झालेल्या खेळाडूला पुन्हा बोलावले, नेमकं काय घडलं? )
तसं पाहिलं टी20I मध्ये डावाच्या पहिल्याच इनिंगवर षटकार मारणारा अभिषेक शर्मा हा चौथा भारतीय आहे. याआधी रोहित शर्मा (इंग्लंड विरुद्ध अहमदाबाद 2021), यशस्वी जयस्वाल (झिम्बाब्वे विरुद्ध हरारे 2024) आणि संजू सॅमसन (इंग्लंड विरुद्ध मुंबई 2025) यांनी हा पराक्रम केला आहे, परंतु यापैकी कुणीही टार्गेटचा पाठलाग करताना डावाच्या पहिल्याच बॉलवर सिक्स मारलेला नाही. अभिषेक शर्मा असा विक्रमी विक्रम करणारा भारताचा पहिला बॅटर बनला आहे.
जुलै 2024 मध्ये टी-20I मध्ये पदार्पण करणाऱ्या या डावखुऱ्या फलंदाजाच्या नावावर या फॉरमॅटमध्ये कोणत्याही भारतीय खेळाडूने केलेली सर्वोच्च वैयक्तिक स्कोअर देखील आहे. या वर्षाच्या सुरुवातीला वानखेडे स्टेडियमवर इंग्लंडविरुद्ध 135 रन्स त्याने केले होते. त्यावेळी त्याने सहकारी शुभमन गिलचा (126*) मागील विक्रम मोडला.
याशिवाय अभिषेक शर्मा हा भारताकडून सलामीवीर म्हणून टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 15 इनिंगनंतर सर्वाधिक सिक्स मारणारा बॅटर बनला आहे.