Asia Cup 2025: रोहित शर्माला मोठा धक्का! हाँगकाँगच्या 'बाबर'ने रचला इतिहास

Asia Cup 2025 : हाँगकाँगचा या मॅचमध्ये मोठा पराभव झाला असला तरी बर हयातने रोहित शर्माचा महा रेकॉर्ड मोडून क्रिकेट विश्वामध्ये खळबळ उडवून दिली. 

जाहिरात
Read Time: 2 mins
Rohit Sharma: आशिया कप 2025 च्या पहिल्याच सामन्यात रोहित शर्माचा रेकॉर्ड तुटला आहे.
मुंबई:

Babar Hayat Record :  सलामीवीर सेदिकुल्लाह अटल आणि अजमतुल्लाह उमरजई यांच्या हाफ सेंच्युरीच्या जोरावर अफगाणिस्ताननं हाँगकाँगचा 94 रन्सनं सहज पराभव केला. हाँगकाँगचा या मॅचमध्ये मोठा पराभव झाला असला तरी बर हयातने रोहित शर्माचा महा रेकॉर्ड मोडून क्रिकेट विश्वामध्ये खळबळ उडवून दिली. 

कोणता रेकॉर्ड मोडला?

 टी-20 एशिया कपच्या इतिहासात सर्वाधिक रन्स करण्याच्या बाबतीत बाबर हयातने रोहित शर्माला मागे टाकले आहे. रोहितने टी-20 एशिया कपमध्ये एकूण 9 सामने खेळून 271 रन्स केले आहेत. तर, आता बाबर हयातच्या नावावर 6 सामन्यांच्या 6 इनिंगमध्ये 274 रन्स झाले आहेत. म्हणजेच, हाँगकाँगचा बाबर हयात आता टी-20 एशिया कपमध्ये सर्वाधिक रन्स करणाऱ्या बॅटर्सच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. या यादीत सध्या पहिल्या क्रमांकावर विराट कोहली आहे, ज्याच्या नावावर 10 सामन्यांच्या 9 इनिंगमध्ये 429 रन्स आहेत.  दुसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान आहे. त्याच्या नावावर 6 सामन्यांच्या 6 इनिंगमध्ये 281 रन्स आहेत.  हाँगकाँगकडून बाबर हयातने एकट्याने झुंज देत 43 बॉलमध्ये 39 रन्सची खेळी केली आणि सामना कायम ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. 

( नक्की वाचा : Chris Gayle : “KL राहुलने मला फोन केला...”, ख्रिस गेलचा पंजाब किंग्जवर गंभीर आरोप, पाहा Video )
 

टी-20 एशिया कपमध्ये सर्वाधिक रन्स करणारे बॅटर:

  • विराट कोहली (भारत) - 10 सामने, 9 इनिंग, 429 रन्स
  • मोहम्मद रिझवान (पाकिस्तान) - 6 सामने, 6 इनिंग, 281 रन्स
  • बाबर हयात (हाँगकाँग) - 6 सामने, 6 इनिंग, 274 रन्स
  • रोहित शर्मा (भारत) - 9 सामने, 9 इनिंग, 271 रन्स
  • इब्राहिम जादरान (अफगाणिस्तान) - 5 सामने, 197 रन्स

अफगाणिस्तानचा दमदार विजय

या सामन्यात सेदिकुल्लाह (नाबाद 73, 52 चेंडू, चार फोर, तीन सिक्स) ने त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी खेळली. तसेच, त्याने उमरजई (53 रन्स, 21 चेंडू, पाच सिक्स, दोन फोर) सोबत पाचव्या विकेटसाठी 82 रन्संची भागीदारी केली. त्यामुळे अफगाणिस्तानने 6 विकेट्स गमावून 188 रन्स केल्या. अजमतुल्लाहने अंतिम षटकांमध्ये तुफानी फलंदाजी करत अफगाणिस्तानकडून 20 बॉलमध्ये सर्वात जलद हाफ सेंच्युरी झळकावली. सेदिकुल्लाहने मोहम्मद नबी (33) सोबतही तिसऱ्या विकेटसाठी 51 रन्स जोडल्या.

या धावसंख्येच्या प्रत्युत्तरात हाँगकाँगचा संघ कधीही विजयाच्या जवळ पोहोचू शकला नाही. बाबर हयातच्या 39 रन्संच्या खेळीनंतरही, संघ 9 विकेट्स गमावून केवळ 94 रन्सच करू शकला. बाबर व्यतिरिक्त, फक्त कॅप्टन यासिम मुर्तजाला (16) दोन अंकी रन्स करता आले.

अफगाणिस्तानकडून गुलबदिन नायब (8 रन्समध्ये 2 विकेट्स) आणि फजलहक फारुकी (16 रन्समध्ये 2 विकेट्स) यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतले, तर अजमतुल्लाह उमरजई (4 रन्समध्ये 1 विकेट), कर्णधार राशिद खान (24 रन्समध्ये 1 विकेट) आणि नूर अहमद (16 रन्समध्ये 1 विकेट) यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Advertisement
Topics mentioned in this article