Asia Cup 2025: Date, Time, Schedule, Format, Full Squads And Live Streaming : इंग्लंड दौऱ्यानंतरच्या मोठ्या ब्रेकमुळे कंटाळलेल्या टीम इंडियाच्या फॅन्सची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. 9 सप्टेंबर पासून संयुक्त अरब अमिराती (UAE) 17 वी आशिया कप स्पर्धा खेळली जाणार आहे. या स्पर्धेत टीम इंडिया सहभागी होणार आहे. भारत-पाकिस्तान संघर्षानंतर या स्पर्धेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं. पण, ही स्पर्धा अखेर होणार आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ला आणि 'ऑपरेशन सिंदूर' नंतर पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेट टीम टीम एकमेकांच्या समोर उभ्या राहणार आहेत. त्यामुळे या स्पर्धेकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय.
आशिया कप स्पर्धेचे स्वरुप काय?
आशिया कप स्पर्धा यंदा T20 स्परुपात होणार आहे. यामध्ये एकूण 8 टीम सहभागी होणार आहेत.
स्पर्धेत सहभागी होणारे संघ
ACC चे 5 स्थायी सदस्य - भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांच्यासह हाँगकाँग, ओमान आणि UAE या 3 संघानी या स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. हे संघ प्रत्येकी 4 च्या दोन गटांमध्ये विभागले गेले आहेत:
ग्रुप A: भारत, पाकिस्तान, ओमान, UAE
ग्रुप B: बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान, हाँगकाँग
( नक्की वाचा : Team India : आशिया कपनंतर टीम इंडियात मोठे बदल, रोहित, गिल नाही तर 'हा' खेळाडू होणार वन-डे टीमचा कॅप्टन? )
स्पर्धेमध्ये दोन गट टप्पे आणि त्यानंतर अंतिम सामना असा फॉरमॅट आहे. गट टप्प्यानंतर प्रत्येक गटातील टॉप 2 संघ 'सुपर फोर' मध्ये प्रवेश करतील. सुपर फोरमध्ये सर्व संघ एकमेकांविरुद्ध खेळतील आणि यातून टॉप 2 संघ अंतिम सामन्यासाठी पात्र ठरतील.
भारत विरुद्ध पाकिस्तान आणि फायनल कधी?
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला सामना रविवार, 14 सप्टेंबर रोजी दुबईमध्ये होणार आहे. दोन्ही संघ सुपर फोरमध्ये पोहोचल्यास 21 सप्टेंबर रोजी पुन्हा आमनेसामने येतील. जर दोन्ही संघ अंतिम सामन्यासाठी पात्र ठरले, तर 28 सप्टेंबर रोजी त्यांचा तिसरा आणि महत्त्वाचा सामना खेळला जाईल.
संपूर्ण वेळापत्रक
साखळी फेरी
ग्रुप A
10 सप्टेंबर: भारत vs UAE, दुबई, रात्री 8:00
12 सप्टेंबर: पाकिस्तान vs ओमान, अबू धाबी, रात्री 8:00
14 सप्टेंबर: भारत vs पाकिस्तान, दुबई, रात्री 8:00
15 सप्टेंबर: UAE vs ओमान, अबू धाबी, सायं. 5:30
17 सप्टेंबर: पाकिस्तान vs UAE, दुबई, रात्री 8:00
19 सप्टेंबर: भारत vs ओमान, अबू धाबी, रात्री 8:00
ग्रुप B
9 सप्टेंबर: अफगाणिस्तान vs हाँगकाँग, अबू धाबी, रात्री 8:00
11 सप्टेंबर: बांगलादेश vs हाँगकाँग, दुबई, रात्री 8:00
13 सप्टेंबर: श्रीलंका vs बांगलादेश, अबू धाबी, रात्री 8:00
15 सप्टेंबर: श्रीलंका vs हाँगकाँग, दुबई, सायं. 5:30
16 सप्टेंबर: बांगलादेश vs अफगाणिस्तान, अबू धाबी, रात्री 8:00
18 सप्टेंबर: श्रीलंका vs अफगाणिस्तान, दुबई, रात्री 8:00
सुपर फोर
20 सप्टेंबर: गट B क्वालिफायर 1 vs गट B क्वालिफायर 2, रात्री 8:00
21 सप्टेंबर: गट A क्वालिफायर 1 vs गट A क्वालिफायर 2, रात्री 8:00
23 सप्टेंबर: गट A क्वालिफायर 1 vs गट B क्वालिफायर 2, रात्री 8:00
24 सप्टेंबर: गट B क्वालिफायर 1 vs गट A क्वालिफायर 2, रात्री 8:00
25 सप्टेंबर: गट A क्वालिफायर 2 vs गट B क्वालिफायर 2, रात्री 8:00
26 सप्टेंबर: गट A क्वालिफायर 1 vs गट B क्वालिफायर 1, रात्री 8:00
फायनल
28 सप्टेंबर: फायनल, रात्री 8:00
Asia Cup 2025 Live Streaming : कुठे पाहणार मॅच?
भारतीय प्रेक्षकांना आशिया कप 2025 ही स्पर्धा सोनी स्पोर्ट्स आणि Sonlyliv App वर पाहता येईल