
Australia legend Michael Clarke diagnosed with skin cancer : ऑस्ट्रेलियाचा महान क्रिकेटपटू आणि वर्ल्ड कप विजेता कॅप्टन मायकेल क्लार्कला त्वचेचा कॅन्सर झाल्याचे निदान झाले आहे. त्याने सोशल मीडियावर त्याच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आणि इतरांनाही नियमित आरोग्य तपासणी करून घेण्याचे आवाहन केले आहे. इंस्टाग्रामवरील एका पोस्टमध्ये क्लार्कने लिहिले आहे:
"त्वचेचा कर्करोग (स्किन कॅन्सर) ही एक खरी समस्या आहे! विशेषतः ऑस्ट्रेलियामध्ये. आज माझ्या नाकातून आणखी एक गाठ काढण्यात आली. नियमितपणे तुमच्या त्वचेची तपासणी करून घ्या, ही एक आठवण करून देणारी गोष्ट आहे. प्रतिबंध हा उपचारापेक्षा चांगला असतो, पण माझ्या बाबतीत नियमित तपासणी आणि लवकर निदान होणे महत्त्वाचे आहे. @drbishsoliman_ यांनी लवकर ओळखल्याबद्दल मी खूप आभारी आहे".
क्लार्कची गौरवशाली कारकिर्द
क्लार्कने 2004 ते 2015 या काळात ऑस्ट्रेलियासाठी 115 कसोटी, 245 एकदिवसीय आणि 34 टी-20 सामने खेळले. त्याने कसोटी आणि एकदिवसीय या दोन्ही फॉरमॅटमध्ये संघाचे नेतृत्व केले. क्लार्कच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने 74 कसोटी (47 विजय, 16 पराभव) आणि 139 एकदिवसीय सामने खेळले.
( नक्की वाचा : Sachin Tendulkar : 'युवी' नव्हे, धोनीच का? 2011 वर्ल्ड कपमधील ऐतिहासिक क्षणामागचे गुपित अखेर सचिननेच सांगितले )
त्याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने 2013-14 मध्ये ॲशेस मालिका 5-0 ने जिंकली आणि 2015 चा वन-डे वर्ल्ड कप जिंकला. आक्रमक डावपेच आणि परिस्थितीनुसार डावपेच रचण्यात कुशल कॅप्टन अशी क्लार्कची मैदानावरची ओळख होती. तो ऑस्ट्रेलियासाठी खेळलेल्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक म्हणून इतिहासात ओळखला जातो.
का होतो स्किन कॅन्सर?
स्किन कॅन्सर हा मुख्यत: सूर्यप्रकाश किंवा टॅनिंग बेड्समधून निघणाऱ्या अतिनील (UV) किरणांमुळे त्वचेच्या असामान्य पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे होतो. हा जगभरात कॅन्सरचा सर्वात सामान्य प्रकार आहे. लवकर निदान आणि उपचार झाल्यास, यावर यशस्वीपणे मात करणे शक्य आहे.
ऑस्ट्रेलियामध्ये स्किन कॅन्सरचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे, कारण तिथे अतिनील किरणांचे प्रमाण जास्त आहे. तो देश विषुववृत्ताच्या जवळ आहे आणि गोऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. आकडेवारीनुसार, 70 वर्षे वयापर्यंत, प्रत्येक 3 ऑस्ट्रेलियन लोकांपैकी 2 लोकांना कोणत्याही प्रकारचा स्किन कॅन्सर होण्याचा धोका असतो.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world