Ayush Mhatre, IND Under-19 vs England U19: भारत आणि इंग्लंड अंडर-19 संघांदरम्यान खेळल्या गेलेल्या दोन सामन्यांची यूथ टेस्ट सीरिज नुकतीच संपली आहे. दोन्ही सामने ड्रॉ झाले असले तरी भारताच्या तरुण पोरांनी युवा खेळाडूंनी ज्या प्रकारे उत्कृष्ट प्रदर्शन केले, ते पाहून प्रत्येकजण आनंदित झाला आहे. मालिकेतील शेवटचा सामना 20 ते 23 जुलै दरम्यान चेम्सफोर्ड येथे खेळला गेला.
या सामन्यात कॅप्टन आयुष म्हात्रेने आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी खूप प्रयत्न केले, मात्र त्यांना यश आले नाही. मुंबईकर आयुषनं पहिल्या इनिंगमध्ये 80 रन्सचे योगदान दिले. त्यानंतर दुसऱ्या इनिंगमध्येही त्याची बॅट चांगलीच तळपली. त्यानं पहिल्या 25 बॉलमध्येच हाफ सेंच्युरी पूर्ण केली. त्यानंतर, 64 व्या बॉलवर एक रन करत त्यानं सेंच्युरी पूर्ण केली. या सामन्यात त्याने एकूण 80 बॉलचा सामना करत 157.50 च्या स्ट्राइक रेटने 126 रन्सची शानदार खेळी केली.
( नक्की वाचा : IND vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का! ऋषभ पंत ॲम्ब्युलन्सने मैदानाबाहेर, वाचा नेमकं काय घडलं? Video )
आयुषनं रचला इतिहास
18 वर्षीय म्हात्रेने दुसऱ्या कसोटी सामन्यात एकूण 170 चेंडू खेळले. या दरम्यान, त्याने 206 रन्स केले. या इनिंगमध्ये त्याचा स्ट्राइक रेट 121.17 राहिला. यासह, त्याने इंग्लंड क्रिकेट संघाचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक आणि न्यूझीलंड क्रिकेट संघाचे माजी कॅप्टन ब्रँडन मॅकलमचा 24 वर्षांचा जुना रेकॉर्ड मोडला आहे.
2001 साली न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात लिंकन येथे खेळल्या गेलेल्या एका यूथ कसोटी सामन्यात मॅकलमने 200 पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. त्यावेळी त्यांचा स्ट्राइक रेट 108.41 होता. आता इंग्लंडविरुद्ध चेम्सफोर्ड येथे झालेल्या यूथ कसोटीत आयुषने 121.17 च्या स्ट्राइक रेटने धावा करत हा रेकॉर्ड स्वत:च्या नावावर केला आहे.