Saina Nehwal : सायना नेहवालचा घटस्फोटावर यू टर्न! नवऱ्यासोबतचा फोटो शेअर करत म्हणाली, कधी, कधी....

Saina Nehwal And Parupalli Kashyap : भारताचे दिग्गज बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि परुपल्ली कश्यप यांनी घटस्फोट घेत असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी केली होती.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

Saina Nehwal And Parupalli Kashyap : भारताचे दिग्गज बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि परुपल्ली कश्यप यांनी घटस्फोट घेत असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी (13 जुलै 2025) केली होती. या घोषणेनंतर 3 आठवड्याच्या आत सायनानं यू टर्न घेतला आहे. ऑलिंपिक पदक विजेत्या सायनानं कश्यपसोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. त्यामध्ये तिनं ''पुन्हा प्रयत्न करत आहेत",अशी घोषणा केली आहे. यापूर्वी 13 जुलै रोजी, सायनाने धक्कादायकपणे कश्यपपासून विभक्त झाल्याची घोषणा केली होती. 1 दशकाहून अधिक काळ एकत्र असलेले हे जोडपे 2018 मध्ये विवाहबद्ध झाले होते.

काय म्हणाली सायना?

सायना नेहवालनं  इंस्टाग्रामवर कश्यपसोबतचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये समुद्र आणि पर्वतांची सुंदर पार्श्वभूमी दिसत आहे. "कधीकधी दुरावा तुम्हाला अस्तित्वाची किंमत शिकवतो. आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत," असे तिने कॅप्शनमध्ये लिहिले. 

सायनानं यापूर्वी "आयुष्य कधीकधी आपल्याला वेगवेगळ्या दिशांना घेऊन जाते," असे पोस्टमध्ये लिहिले होते.

"खूप विचार आणि मंथन केल्यानंतर, मी आणि कश्यप परुपल्लीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही स्वतःसाठी आणि एकमेकांसाठी शांतता, वाढ आणि उपचार निवडत आहोत. मी आठवणींबद्दल कृतज्ञ आहे आणि पुढे जाण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देते. या काळात आमच्या गोपनीयतेचा आदर केल्याबद्दल धन्यवाद." त्यानंतर तीन आठवड्यांच्या आतच सायनानं नवी पोस्ट करत घटस्फोटाचा निर्णय रद्द करत असल्याचे संकेत दिले आहेत. 

या पोस्टवर प्रतिक्रिया देताना, चाहत्यांनी या बातमीचे स्वागत केले आणि या जोडप्याच्या पुन्हा एकत्र आल्याचा आनंद व्यक्त केला.

( नक्की वाचा : Jasprit Bumrah : आशिया कपपूर्वी टीम इंडियाला धक्का! जसप्रीत बुमराह आऊट, कारण काय? )
 

सायना नेहवाल आणि परुपल्ली कश्यप यांच्या मैदानावर आणि मैदानाबाहेर असलेल्या दीर्घकाळाच्या नात्यामुळे विभक्त होण्याची घोषणा क्रीडा जगतासाठी आणि चाहत्यांसाठी धक्कादायक होती. 

 जागतिक क्रमवारीत यापूर्वी 1 नंबर असलेली आणि ऑलिंपिक ब्रॉन्झ मेडल विजेती सायना, भारतीय महिलांसाठी खेळातील एक मार्गदर्शक राहिली आहे. कश्यपचीही कारकीर्द उल्लेखनीय आहे, त्याने ऑलिंपिक आणि राष्ट्रकुल खेळांसह जागतिक स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.