Rohit Sharma : बुमराहच्या विकेट्सपेक्षा रोहितचे कमी रन, असा कसा टीम इंडियाचा कॅप्टन?

Border-Gavaskar Trophy : भारतीय टीमसाठी आता 'करो वा मरो' परिस्थिती आहे. त्याचवेळी टीममधील पहिला खेळाडू म्हणजेच कॅप्टन रोहित शर्माचा (Rohit Sharma) खराब फॉर्म टीमसाठी डोकेदुखी बनलाय.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

Border-Gavaskar Trophy : भारत विरुद्ध ऑस्ट्रलिया (India vs Australia) यांच्यातील प्रतिष्ठेची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सध्या सुरु आहे. या सीरिजमधील पाचपैकी तीन टेस्ट संपल्या आहेत. त्यानंतर दोन्ही टीम 1-1 नं बरोबरीत आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) स्पर्धेची फायनल गाठण्यासाठी टीम इंडियाला उर्वरित दोन्ही टेस्ट जिंकणं आवश्यक आहे. भारतीय टीमसाठी आता 'करो वा मरो' परिस्थिती आहे. त्याचवेळी टीममधील पहिला खेळाडू म्हणजेच कॅप्टन रोहित शर्माचा (Rohit Sharma) खराब फॉर्म टीमसाठी डोकेदुखी बनलाय.

रोहितचे फक्त 19 रन्स

या सीरिजमधील पर्थमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये रोहित शर्मा वैयक्तिक कारणामुळे खेळला नाही. जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) कॅप्टनसीमध्ये भारतीय टीमनं ती टेस्ट खेळली आणि जिंकली. त्यानंतर अ‍ॅडलेडमध्ये झालेल्या पिंक बॉल टेस्टमध्ये  रोहित शर्मा कॅप्टन म्हणून टीममध्ये दाखल झाला. रोहितचा समावेश टीमसाठी लाभदायक ठरली नाही. टीम इंडियानं पिंक बॉल टेस्ट 10 विक्ेट्सनं गमावली. 

त्यानंतर ब्रिस्बेनमधील गाबावर झालेली टेस्ट मॅच पावसाच्या अडथळ्यामुळे ड्रॉ झाली. अ‍ॅडलेड आणि ब्रिस्बेनमध्ये झालेल्या 2 टेस्टमधील 4 पैकी 3 इनिंगमध्ये रोहितनं बॅटिंग केली. भारतीय कॅप्टननं या 3 इनिंगमध्ये मिळून 6.33 च्या सरासरीनं फक्त 19 रन केले आहेत. तीनपैकी फक्त एकाच इनिंगमध्ये त्याला दोन अंकी रन करता आलेत. 10 असा त्याचा या सीरिजमधील आत्तापर्यंतचा सर्वोच्च स्कोअर आहे.

( नक्की वाचा : 'BCCI शी चर्चा झालीच नव्हती,' 'या' खेळाडूच्या निवडीमुळे अश्विननं केली निवृत्तीची घाई? )

बुमराहच्या विकेट्स जास्त

भारतीय टीमचा कॅप्टन फ्लॉप होत असताना व्हाईस कॅप्टन जसप्रीत बुमराह जबरदस्त फॉर्मात आहे. रोहितच्या अनुपस्थितीमध्ये बुमराहनं पर्थ टेस्टमध्ये कुशल कॅप्टनसी केली. त्यानं आघाडीवर राहत भारतीय बॉलिंगचं नेतृत्त्व केलं. त्यामुळे टीम इंडियानं पर्थ टेस्ट 295 रननं दणदणीत जिंकली. बुमराहनं पर्थ टेस्टमध्ये 8 विकेट्स घेतल्या. या कामगिरीबद्दल त्याला 'प्लेयर ऑफ द मॅच' पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. 

Advertisement

पर्थप्रमाणेच अ‍ॅडलेड आणि ब्रिस्बेनमध्ये बुमराहचा फॉर्म कायम आहे. बुमराहनं आत्तापर्यंत 3 टेस्टमध्ये 10.90 च्या सरासरीनं 21 विकेट्स घेतल्या आहेत. बुमराह आत्तापर्यंत या सीरिजमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा बॉलर आहे. विशेष म्हणजे रोहित शर्मानं आत्तापर्यंत काढलेल्या 19 रन्सपेक्षा बुमराहनं घेतलेल्या विकेट्स (21) जास्त आहेत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

रोहितचा फ्लॉप शो

रोहित शर्माची खराब कामगिरी फक्त या सीरिजपुरती मर्यादीत नाही. यापूर्वी भारतामध्ये न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या सीरिजमध्येही रोहित फ्लॉप ठरला होता. त्यानं 3 टेस्टमधील 6 इनिंगमध्ये अवघ्या 15.16 च्या सरासरीनं फक्त 91 रन काढले होते. संपूर्ण सीरिजमध्ये त्याला एकच हाफ सेंच्युरी झळकावता आली होती. 

Advertisement

टीम इंडियानं यावर्षी तब्बल 12 वर्षानं मायदेशात टेस्ट सीरिज गमावली. न्यूझीलंडविरुद्ध टीमचा 0-3 असा लाजीरवाणा पराभव झाला. रोहितच्या कॅप्टनसीमध्येच भारतीय टीमला ही नामुश्की सहन करावी लागली. त्या सीरिजमध्ये ओपनर म्हणून रोहित अपयशी ठरला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध ओपनिंगची जागा सोडली. मागील दोन टेस्टमध्ये सहाव्या क्रमांकावर बॅटींग केली. त्यानंतर त्याच्या बॅटमधून मोठ्या खेळीची प्रतीक्षा कायम आहे.

अश्विनचा न्याय रोहितला का नाही?

महान भारतीय ऑफस्पिनर आर. अश्विनला न्यूझीलंडविरुद्धच्या सीरिजमध्ये अपेक्षेनुसार कामगिरी करता आली नाही. त्यानंतरच अश्विनच्या टीममधील जागेवर प्रश्न उपस्थित झाला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याला तीन पैकी फक्त एकाच टेस्टमध्ये संधी मिळाली. उर्वरित दोन टेस्टमध्ये खेळण्याची त्याला कोणतीही खात्री टीम मॅनेजमेंटनं दिली नाही. त्यामुळे अश्विननं सीरिज संपण्यापूर्वीच निवृत्ती स्विकारली. 

Advertisement

अश्विनला लावलेला न्याय रोहितला का नाही? कॅप्टन आणि बॅटर म्हणून फ्लॉप होत असूनही रोहितची टीममधील जागा निश्चित का आहे? त्याचं नावं प्लेईंग 11 मध्ये सर्वात पहिल्यांदा का आहे? असे प्रश्न आता विचारले जात आहेत. 

( नक्की वाचा : Ashwin : कदाचित अश्विनचा अपमान झाला असेल... वडिलांचा धक्कादायक दावा! क्रिकेटपटूनं दिलं स्पष्टीकरण )

टेस्ट कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यावर असलेल्या रोहितला या सर्व प्रश्नांची उत्तरं आगामी सीरिजमध्ये बॅटमधून द्यावे लागतील. रोहित शर्माच्या आजवरच्या कारकिर्दीमधील सर्वात महत्त्वाच्या दोन टेस्ट पुढील 15 दिवसांमध्ये आहेत.