Brydon Carses Cheap Tactics: भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील दुसरी टेस्ट बर्मिंगहॅमध्ये सुरु आहे. या टेस्टच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाचा कॅप्टन शुबमन गिलंनं (Shubman Gill) केलेल्या बॅटिंगचं सर्वांकडून कौतुक होत आहे. गिलनं पहिल्या दिवशी 216 बॉल्सचा सामना करत 52.77 च्या स्ट्राईक रेटनं नाबाद 114 रन्स काढले.
इंग्लिश बॉलर्सनी गिलची कठोर परीक्षा घेतली. पण, टीम इंडियाचा कॅप्टन सर्व परीक्षांमध्ये यशस्वी ठरला. गिलचा संयमी खेळ पाहून इंग्लंडच्या बॉलर्सचा संयम संपला. त्यावेळी त्यांनी मैदानात गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. याबाबतचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
नेमकं काय घडलं?
Sony Sports Network ने सामन्यादरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामध्ये इंग्लंडचा फास्ट बॉलर ब्रायडन कार्स शुबमन गिलचे लक्ष विचित्र करण्यासाठी विचित्र कृती करताना दिसत आहे.
( नक्की वाचा : Shubman Gill: टीम इंडियाच्या कॅप्टनचा डबल धमाका, इंग्लंडच नाही तर SENA देशात रचला इतिहास! )
वास्तविक, 34 व्या ओव्हरमधील तिसरा बॉल टाकताना कार्सने त्याचा हात हलवण्यास सुरुवात केली, ज्यामुळे गिलचे लक्ष विचलित होऊन आऊट व्हावा असा त्याचा उद्देश होता. मात्र, येथे भारतीय कॅप्टननं हुशारी दाखवली आणि बॉल खेळणे टाळले.
गिलच्या हुशारीचा कार्सलाच फटका बसला. त्याला पुन्हा एकदा बॉलिंग लाईनअपवर जावे लागले. इंग्लंडच्या बॉलर्सनं खेळलेल्या रडीच्या डावाचा फॅन्सनी सोशल मीडियावर निषेध केला.
क्रिकेट फॅन्सचा दाा आहे की कार्स हा गिलला आऊट करण्यासाठी हे रडीचे प्रकार करत होता. पण, तो पहिल्या संपूर्ण दिवसात यशस्वी झाला नाही. पहिल्या दिवशी कार्सने एकूण 16 ओव्हर्स बॉलिंग केली. केली. या काळात 49 रन्स देत तो फक्त करुण नायरची विकेट घेण्यात यशस्वी ठरला.