Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीतील चौथा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (Australia vs England) यांच्यात झाला. क्रिकेट विश्वातील दोन बड्या टीममधील हा सामना अपेक्षेप्रमाणे रंगला. लाहोरमध्ये झालेल्या या मॅचमध्ये इंग्लंडनं पहिल्यांदा बॅटींग करताना 8 आऊट 351 रन्स केले होते. ऑस्ट्रेलियानं हे आव्हान 5 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात यापूर्वी कधीही इतकं मोठं टार्गेट पूर्ण झालेलं नव्हतं. ऑस्ट्रेलियानं रेकॉर्डब्रेक विजय मिळवत इतर सर्व टीम्सना गंभीर इशारा दिला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कशी झाली मॅच?
352 रन्सचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. टीम इंडियाची वारंवार डोकेदुखी ठरलेला ट्रेव्हिस हेड (Travis Head) फक्त 6 रन काढून आऊट झाला. त्यापाठोपाठ कॅप्टन स्टीव्ह स्मिथ (Steven Smith) 5 रन काढून आऊट झाल्यानं ऑस्ट्रेलियाची अवस्था 2 आऊट 27 अशी झाली होती.
( नक्की वाचा : IND vs PAK : टीम इंडियाचे 5 खेळाडू करणार पाकिस्तानचं पॅकअप, विजेतेपदाच्या शर्यतीतून करणार आऊट! )
खराब सुरुवातीनंतर ऑस्ट्रेलियानं न डगमगता खेळ केला. ओपनर मॅथ्यू शॉर्टनं हाफ सेंच्युरी करत 63 रन केले. तर मार्नस लबुशेननं 47 रन्सची खेळी केली. ऑस्ट्रेलियाच्या इनिंगचा खरा हिरो ठरला तो जोश इंग्लिस (Josh Inglis) . पाचव्या क्रमांकावर आलेल्या इंग्लिसनं दमदार सेंच्युरी झळकावली. त्यानं फक्त 77 बॉलमध्ये 8 फोर आणि 4 सिक्सच्या मदतीनं सेंच्युरी झळकावली. इंग्लिसनं 86 बॉलमध्ये नाबाद 120 रन केले. अनुभवी ग्लेन मॅक्सवेलनं 15 बॉलमध्ये नाबाद 32 रन करत त्याला चोख उत्तर दिलं.
जोश इंग्लिस आणि अॅलेक्स कॅरी यांनी पाचव्या विकेटसाठी 116 बॉलमध्ये 146 रन्सची पार्टनरशिप केली. कॅरी 69 रन काढून आऊट झाला. त्यानंतर जोश इंग्लिसनं मॅचची सूत्रं हाती घेत ऑस्ट्रेलियाला संस्मरणीय विजय मिळवून दिला.
बेन डकेटची दमदार सेंच्युरी
त्यापूर्वी इंग्लंडकडून बेन डकेटनं दमदार खेळी करत 165 रन काढले. डकेटनं 143 बॉल्समध्ये 17 फोर आणि 3 सिक्सच्या मदतीनं 165 रन केले. अनुभवी जो रुटनं 68 रन करत चांगली साथ दिली. इंग्लंडच्या फलंदाजांनी आक्रमक फटकेबाजी करत 8 आऊट 351 पर्यंत मजल मारली. पण, अखेर हा स्कोअर देखील अपुरा ठरला.