IPL 2026 : 'या' 2 खेळाडूंच्या बदल्यात सीएसकेकडून खेळणार संजू सॅमसन! दोन्ही फ्रँचायझीमध्ये चर्चा सुरु

IPL 2026: क्रिकेट विश्वातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी आहे. संजू सॅमसन पुढील सिझनमध्ये सीएसकेकडून खेळण्याची शक्यता आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Sanju Samson : संजू सॅमसन सीएसकेकडून खेळणार अशी चर्चा सुरु आहे.
मुंबई:

IPL 2026: क्रिकेट विश्वातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी आहे. आयपीएलच्या 19 व्या सिझनमध्ये (IPL 2026) राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन संजू सॅमसन (Sanju Samson) हा चेन्नई सुपर किंग्सकडून खेळू शकतो. सीएसकेच्या दोन खेळाडूंच्या बदल्यात राजस्थान रॉयल्स संजूला चेन्नईला ट्रान्सफर करेल, अशी सध्या चर्चा आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे चर्चा?

'इनसाईड स्पोर्ट्स' नं दिलेल्या वृत्तानुसार ला केरळच्या या विकेटकिपर बॅटरच्या  एजंटने सोशल मीडियावर एका पोस्टला लाईक केले होते. त्या पोस्टमध्ये असे म्हटले होते की, पुढील हंगामात संजू सॅमसन सीएसकेमध्ये दाखल होऊ शकतो. मात्र यासाठी सीएसकेला त्यांचे दोन मोठे खेळाडू राजस्थान रॉयल्सला द्यावे लागतील.

दिग्गज ऑफ स्पिनर रविंद्रन अश्विनच्या जवळचे मानले जात असलेल्या प्रसन्ना अघोराम यांनी देखील याबाबत दावा केला आहे. त्यांच्या दाव्यानुसार राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये या विषयावर चर्चा सुरु झाली आहे. अघोराम यांच्या दाव्यानुसार एक भारतीय ऑफ स्पिनर आणि मीडल ऑर्डरमधील डावखुऱ्या बॅटरच्या बदल्यात राजस्थान सीएसकेला टॉप ऑर्डरमधील विकेट किपर-बॅटरला देण्याच्या विचारात आहे. 

ते 2 खेळाडू कोण? 

प्रसन्ना यांनी ज्या भारतीय ऑफ-स्पिनरचा उल्लेख केला आहे, तो ऑफ स्पिनर आर. अश्विन असण्याची शक्यता आहे.अश्विनचे तब्बल दहा वर्षांनंतर मागील सिझनमध्ये सीएसकेच्या टीममध्ये पुनरागमन झाले. पण, त्याला समाधानकारक कामगिरी करता आली नाही. त्याला 9 मॅचमध्ये फक्त 7 विकेट्स घेता आल्या. तर यापूर्वी राजस्थान रॉयल्सकडून अश्विननं चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे राजस्थानची टीम अश्विनला पुन्हा ताफ्यात घेऊ शकते.

( नक्की वाचा : IND vs ENG : पहिल्या टेस्टमधील पराभवानंतर टीम इंडियात बदल, 'या' खेळाडूची हकालपट्टी )
 

तर दुसरा डावखुरा बॅटर हा शिवम दुबे असू शकतो, असा अंदाज अनेक जण व्यक्त करत आहेत. अर्थात सीएसकेच्या मीडल ऑर्डरमध्ये रविंद्र जडेजा हा देखील डावखुरा बॅटर आहे. पण, जडेजानं सीएसकेसाठी नेहमीच ऑलराऊंडर म्हणून कामगिरी केली आहे. तो सीएसकेचा आधारस्तंभ आहे. तसंच त्याला सर्वाधिक रक्कम देऊन आयपीएल 2025 पूर्वी सीएसकेनं रिटेन केले होते. 

Advertisement

त्याचबरोबर गेल्या काही सिझनमध्ये शिवम दुबे सीएसकेकडून फक्त बॅटर म्हणून खेळला आहे. त्यामुळे जडेजापेक्षा त्याच्याच नावाची चर्चा आहे. गेल्या आयपीएल सिझनमध्ये दुबेनं सीएसकेकडून दमदार कामगिरी केली. त्यानं 14 मॅचमध्ये 32.45 च्या सरासरीनं 357 रन्स केले होते. 
 

Topics mentioned in this article