Dhanashree Verma : 'मी फक्त रडत होते, ओरडत होते', धनश्री वर्मानं सांगितला चहलसोबतच्या घटस्फोटाचा अनुभव

Dhanashree Verma vs Yuzvendra Chahal:  भारताचा लेग स्पिनर युजवेंद्र चहलने (युजवेंद्र चहलवरील धनश्री वर्मा) धनश्री वर्मापासून घटस्फोट घेतला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Dhanashree Verma vs Yuzvendra Chahal: धनश्री वर्मानं अखरे मौन सोडलं आहे.
मुंबई:

Dhanashree Verma vs Yuzvendra Chahal:  भारताचा लेग स्पिनर युजवेंद्र चहलने (युजवेंद्र चहलवरील धनश्री वर्मा) धनश्री वर्मापासून घटस्फोट घेतल्यानंतर मानसिक आरोग्यविषयक समस्यांवरील त्याच्या संघर्षाबद्दल मनमोकळेपणाने सांगितले होते. घटस्फोटासाठी कोर्टात हजर असताना, त्याने "आपले शुगर डॅडी स्वतः बना" (अपने शुगर डैडी स्वयं बनें) लिहिलेला टी-शर्ट घातला होता, याचाही त्याने उल्लेख केला. तो म्हणाला होता, "मला कोणताही ड्रामा नको होता, पण दुसऱ्या बाजूने काहीतरी घडले. म्हणून मी टी-शर्टच्या माध्यमातून माझा संदेश दिला. मी कोणालाही शिवीगाळ केली नाही."

धनश्रीनं दिलं उत्तर

चहलची माजी पत्नी धनश्रीनं या सर्व विषयांवर उत्तर दिलं आहे. . 'ह्यूमन्स ऑफ बॉम्बे'शी बोलताना धनश्री म्हणाली, "मला आजही आठवतं, जेव्हा मी तिथे उभी होते आणि निकाल दिला जाणार होता. जरी आम्ही मानसिकदृष्ट्या इतके तयार असलो, तरी मी खूप भावुक झाले होते. मी सर्वांसमोर ओरडायला लागले. त्या क्षणी मी काय अनुभवत होते, हे मी व्यक्त करू शकत नाही. मला फक्त एवढंच आठवतंय की मी फक्त रडत होते, मी फक्त ओरडत होते आणि रडत होते. हे सर्व घडले आणि तो (चहल) तिथून आधीच बाहेर पडला."

( नक्की वाचा : Vinod Kambli : विनोद कांबळीची तब्येत अद्यापही चिंताजनक, भावानं फॅन्सना केलं प्रार्थना करण्याचं आवाहन )
 

युजवेंद्रने 'शुगर डॅडी' वाला टी-शर्ट घातल्याबद्दलही धनश्रीने प्रतिक्रिया दिली आणि म्हणाली, "युजवेंद्रला त्याच्या घटस्फोटाचा जाहीर तमाशा करण्याऐवजी तो खासगी ठेवण्याची इच्छा होती. तुम्हाला माहित आहे की लोक तुम्हालाच दोष देतील. मला या टी-शर्ट स्टंटबद्दल कळण्यापूर्वीच, आम्हाला सगळ्यांना माहीत होतं की लोक यासाठी मलाच दोष देणार आहेत." धनश्री पुढे म्हणाली, "अरे भावा, व्हॉट्सअ‍ॅप केला असता... टी-शर्ट का घालायचा?"

चहलकडं दुर्लक्ष

ऐकेकाळी टीम इंडियाचा आघाडीचा स्पिनर असलेल्या युजवेंद्र चहलकडं निवड समितीनं पुन्हा एकदा दुर्लक्ष केलं आहे. युजवेंद्र चहलची आशिया कपच्या निवड झाली नाही. चहलने भारतासाठी त्याचा शेवटचा सामना 2023 मध्ये खेळला होता. तो बऱ्याच काळापासून भारतीय टीममधून बाहेर आहे. सध्या चहल नॉर्थम्पटनशरसाठी काउंटी क्रिकेट खेळत आहे.
 

Advertisement