Prithvi Shaw: कुणीतरी पृथ्वी शॉला हा फोटो दाखवा, इंग्लंडचा महान खेळाडू का भडकला?

भारतीय क्रिकेट टीममधील दुर्लक्षित बॅटर सरफराज खानने 17 किलो वजन कमी करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Sarfaraz Khan (डावीकडे) आणि Prithvi Shaw
मुंबई:


भारतीय क्रिकेट टीममधील दुर्लक्षित बॅटर सरफराज खानने 17 किलो वजन कमी करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. इंग्लंडविरुद्धच्या सध्याच्या टेस्ट सीरिजच्या टीममध्ये सरफराजचा समावेश नाही. त्याला यापूर्वी वजनावरुन बरीच टीका सहन करावी लागली आहे. वाढते वजन हे  सातत्याने चांगली कामगिरी करूनही निवडकर्त्यांनी त्याला वगळण्याचे ते एक प्रमुख कारण मानले जात होते. 

मात्र  सरफराजने सोशल मीडियावर त्याच्यातील बदलाचे फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे सर्वजण थक्क झाले आहेत. इंग्लंडचा महान खेळाडू केव्हिन पीटरसननं सरफराजमधील बदलावर प्रतिक्रिया दिली आहे. त्याचबरोबर त्यानं या प्रतिक्रियेमध्ये टीम इंडियाचा आणखी एक दु्र्लक्षित स्टार पृथ्वी शॉचेही नाव घेतले.

"उत्कृष्ट प्रयत्न, तरुण पोरा! खूप खूप अभिनंदन आणि मला खात्री आहे की यामुळे मैदानावर चांगली आणि सातत्यपूर्ण कामगिरी होईल. तू तुझी  प्राथमिकता निश्चित करण्यासाठी घालवलेला वेळ मला आवडला! चला तर मग! कोणीतरी पृथ्वीला हे दाखवू शकेल का? हे शक्य आहे! मजबूत शरीर, मजबूत मन!" पीटरसनने पोस्ट केले.

दरम्यान, इंग्लंडविरुद्धच्या सीरिजमध्ये भारताला अनेक दुखापतींनी ग्रासले आहे. टीम इंडियाचा ऑल राऊंडर नितीश कुमार रेड्डी उर्वरित टेस्ट सीरिजमधून बाहेर पडला आहे. तर अर्शदीप सिंग चौथ्या टेस्टमधून बाहेर पडला आहे.

"डाव्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे नितीश कुमार रेड्डी उर्वरित दोन टेस्टमधून बाहेर पडला आहे. नितीश घरी परत जाईल आणि टीम त्याला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देत आहे, असे बीसीसीआयने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

(नक्की वाचा : IND vs PAK : भारतानं ICC स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध खेळलं पाहिजे का? मोहम्मद सिराजनं दिलं उत्तर )

सीरिजमध्ये अजूनही न खेळलेल्या अर्शदीपला गेल्या आठवड्यात बेकनहॅम येथे एका प्रशिक्षण सत्रादरम्यान नेटमध्ये गोलंदाजी करताना डाव्या अंगठ्याला दुखापत झाली होती.

दरम्यान हरियाणाचा फास्ट बॉलर अंशुल कंबोजचा कव्हर म्हणून टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. तो आधीच मँचेस्टरमधील टीमशी जोडला आहे. 

Topics mentioned in this article