FIDE World Chess : भारताच्या डी गुकेशची ऐतिहासिक कामगिरी, सर्वात कमी वयात बनला चॅम्पियन

FIDE World Chess Championship 2024, Gukesh D vs Ding Liren: भारतीय ग्रँडमास्टर डी. गुकेशनं इतिहास घडवला आहे. त्यानं अवघ्या 18 व्या वर्षी फिडे वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेचं त्यानं विजेतेपद पटकावलंय.

जाहिरात
Read Time: 2 mins
File photo of D Gukesh
मुंबई:

FIDE World Chess Championship 2024, Gukesh D vs Ding Liren: भारतीय ग्रँडमास्टर डी. गुकेशनं इतिहास घडवला आहे. त्यानं अवघ्या 18 व्या वर्षी फिडे वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेचं त्यानं विजेतेपद पटकावलंय. गुकेशनं 14 व्या फेरीमध्ये चीनचा गतविजेता डिंग लिरेनचा पराभव केला. 13 व्या फेरीमध्ये दोघांचाही स्कोर 6.5-6.5 होता. त्यानंतर गुकेशनं 14 वी फेरी जिंकत विजेतेपद पटकावलं. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

ही स्पर्धा जिंकणारा गुकेश हा दुसराच भारतीय आहेय.  यापूर्वी विश्वनाथन आनंद 2000-2022, 2007-2013 या काळात वर्ल्ड चॅम्पियन होता.डिंग लिरेननं स्पर्धा टायब्रेकरवर नेण्याचा प्रयत्न केला. पण, गुकेशनं क्लासिकल चेसमध्ये त्याचा पराभव करत विजेतेपद पटकावलं.

वर्ल्ड चेस चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये डिंग लिरेननं केलेल्या चुकांचा फायदा घेत गुकेशनं इतिहास घडवला. गुरुवारी (12 डिसेंबर) रोजी झालेल्या फेरीत ही लढत टायब्रेकरवर जाणार अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. शेवटचा गेम तर तब्बल पाच तासापर्यंत लांबला. त्याच काळात डिंगनं एक चूक केली. त्यामुळे त्याला गेम, सामना आणि चॅम्पियनशिप गमावावी लागली. 

( नक्की वाचा : विनोद कांबळीची कारकिर्द सचिनसारखी बहरली का नाही? राहुल द्रविडनं सांगितलं होतं कारण, Video )
 

यापूर्वी झालेल्या सामन्यात 32 वर्षांच्या लिरेननं पहिली फेरी जिंकली होती. त्यानंतर 18 वर्षांच्या गुकेशनं तिसरी फेरी जिंकत बरोबरी साधली. त्यानंतर दोन्ही ग्रँडमास्टर्समधील पुढच्या सात फेरी अनिर्णित सुटल्या. गुकेशनं 11 वी लढत जिंकत 6-5 नं आघाडी घेतली. त्यानंतर लिरेननं 12 वी लढत जिंकत पुन्हा बरोबरी साधली होती. 

Advertisement