बाप से बढकर बेटा! फिफा वर्ल्ड कपमध्ये खेळलेल्या 5 पिता-पुत्रांच्या जोड्या, 'ही' एक गोष्ट आहे सर्वांमध्ये समान

या देशासाठी खेळूनही या पिता-पुत्राला वर्ल्ड कपमध्ये गोलचे खाते काही उघडता आले नाही.

जाहिरात
Read Time: 3 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • FIFA वर्ल्ड कपमध्ये पिता-पुत्रांच्या पाच प्रसिद्ध जोड्यांनी विविध देशांसाठी खेळून इतिहास रचला आहे
  • मेक्सिकोचे लुइस पेरेज आणि मारियो पेरेज यांनी अनुक्रमे १९३० आणि १९५० मध्ये वर्ल्ड कपमध्ये भाग घेतला
  • स्पेनचे मार्टी वैंटोलरा आणि मेक्सिकोचे जोस वैंटोलरा यांनी वेगवेगळ्या देशांकरिता वर्ल्ड कपमध्ये खेळले
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

FIFA World Cup 2026 चा थरार 11 June पासून सुरू होणार आहे. फुटबॉल जगतातील या सर्वात मोठ्या महाकुंभाची उत्सुकता जगभरात शिगेला आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. फुटबॉलच्या मोठ्या व्यासपिठावर अनेक दिग्गज खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर इतिहास रचला आहे. विशेष म्हणजे, फुटबॉलच्या इतिहासात अशीही काही उदाहरणे आहेत, जिथे बापानंतर त्यांच्या मुलांनीही आपल्या देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. शिवाय फिफा वर्ल्ड कपमध्ये ही ते खेळले आहेत. फिफा वर्ल्ड कपमध्ये खेळणाऱ्या पिता-पुत्रांच्या अशाच 5 प्रसिद्ध जोड्यांबद्दल आपण जाणून घेवूयात. 

​लुइस पेरेज आणि मारियो पेरेज (मेक्सिको)
​मेक्सिकोचे लुइस पेरेज आणि मारियो पेरेज ही जोडी सुप्रसिद्ध आहे. या पिता-पुत्राच्या जोडीने फिफा वर्ल्ड कपमध्ये आपली छाप पाडली होती. त्यांच्या खेळावर सर्वच जण फिदा होता. वडील लुइस पेरेज हे 1930 मध्ये झालेल्या पहिल्यावाहिल्या वर्ल्ड कपमध्ये मेक्सिको संघाकडून खेळले होते. त्यानंतर त्यांचा मुलगा मारियो पेरेज यांने 1950 च्या वर्ल्ड कपमध्ये मेक्सिकोचे प्रतिनिधित्व केले होते. मारियो हे एक उत्तम मिडफील्डर होते. मात्र, या वर्ल्ड कप स्पर्धांमध्ये पिता-पुत्रांपैकी कोणालाही एकही गोल करता आला नव्हता.

Advertisement

​मार्टी आणि जोस वैंटोलरा (स्पेन आणि मेक्सिको)
​या जोडीचे वैशिष्ट्य म्हणजे पिता आणि मुलाने वेगवेगळ्या देशांसाठी वर्ल्ड कप खेळला आहे. वडील मार्टी वैंटोलरा 1934 च्या फिफा वर्ल्ड कपमध्ये स्पेनच्या संघाकडून खेळले होते. मात्र त्यांचा मुलगा जोस वैंटोलरा हा 1970 च्या वर्ल्ड कपमध्ये मेक्सिको देशाकडून खेळला होता.  जोस यांनी या स्पर्धेत 4 सामने खेळले, परंतु त्यांना गोल करण्यात अपयश आले. त्यांच्या वडिलांनाही वर्ल्ड कपमध्ये गोल नोंदवता आला नव्हता. गोल करता आला नाही हे दोघांमधली साम्य होते. 

​डोमिंगोस आणि अदेमिर दा गुइया (ब्राझील)
​फुटबॉल म्हटलं की ब्राझील हे नाव आपोआप तोंडावर येतं. ब्राझीलकडूनही एकाच घरातील दोन पिढ्या वर्ल्ड कप खेळल्या आहेत. वडील डोमिंगोस यांनी 1938 च्या वर्ल्ड कपमध्ये ब्राझीलकडून 4 सामने खेळले होते. त्यानंतर त्यांचा मुलगा अदेमिर दा गुइया यांना 1974 च्या वर्ल्ड कपमध्ये ब्राझीलकडून खेळला. त्याला या स्पर्धेत केवळ 1 सामना खेळण्याची संधी मिळाली. फुटबॉलचा मोठा इतिहास असलेल्या या देशासाठी खेळूनही या पिता-पुत्राला वर्ल्ड कपमध्ये गोलचे खाते  काही उघडता आले नाही.

​रोजर आणि पैट्रिस रियो (फ्रान्स)
​फ्रान्सच्या फुटबॉल इतिहासात रोजर आणि पैट्रिस रियो या पिता-पुत्राचे नाव अभिमानाने घेतात. वडील रोजर रियो 1934 च्या विश्वचषकात फ्रान्सकडून केवळ 1 सामना खेळले होते. त्यानंतर तब्बल 44 वर्षांनी, म्हणजेच 1978 च्या वर्ल्ड कपमध्ये त्यांचा मुलगा  पैट्रिस रियो फ्रान्सच्या संघात सहभागी झाला होता. त्याला ही सामना खेळण्याची संधी मिळाली. या दोन्ही दिग्गज खेळाडूंना आपापल्या काळात वर्ल्ड कपमध्ये गोल करण्यात यश आले नाही. तरीही त्यांची ही जोडी ऐतिहासिक ठरली.

​निकोले आणि इओन लुपस्कु (रोमानिया)
​रोमानिया देशाकडून खेळताना निकोले आणि इओन लुपस्कु यांनी हा अनोखा विक्रम केला आहे. वडील निकोले लुपस्कु 1970 च्या फिफा वर्ल्ड कपमध्ये रोमानियाकडून 3 सामने खेळले होते. त्यांचा मुलगा इओन लुपस्कु यांनी वडिलांचा वारसा पुढे चालवत 1990 आणि 1994 अशा दोन वर्ल्ड कप स्पर्धांमध्ये रोमानियाचे प्रतिनिधित्व केले होते. इओन यांनी एकूण 8 सामने खेळले आहेत. पण संपूर्ण कारकिर्दीत या पिता-पुत्राला वर्ल्ड कपमध्ये एकही गोल करता आला नाही.

Advertisement