Portugal vs Uzbekistan: रोनाल्डोला मोठी संधी! फक्त 1 गोल अन् इतिहासात नोंद होईल नाव, काय आहे तो रेकॉर्ड?

अमेरिकेतील टेक्सासच्या NRG स्टेडियमवर ही लढत होत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • पोर्तुगालचा स्टार फुटबॉलर क्रिस्टियानो रोनाल्डो FIFA वर्ल्ड कप मध्ये अद्याप गोल करू शकलेला नाही
  • पोर्तुगालचा संघ उझबेकिस्तानविरुद्ध सामना जिंकून नॉकआऊट फेरीत जाण्याचा प्रयत्न करणार आहे
  • रोनाल्डोला या सामन्यात युसेबियो यांचा विक्रम तोडण्याची संधी मिळणार आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Cristiano Ronaldo Upcoming record: FIFA वर्ल्ड कप 2026 मध्ये आता खऱ्या अर्थाने रंगत येत आहे. अर्जेंटीनाचा मेस्सी भलताच फॉर्ममध्ये आहे. त्याने आतापर्यंत स्पर्धेत सर्वाधिक गोल केले आहेत. पण दुसरीकडे मात्र पोर्तुगालचा स्टार खेळाडू  क्रिस्टियानो रोनाल्डो अजून ही चाचपडत असताना दिसत आहे. त्याला अजून ही सुर गवसला नाही. शिवाय या वर्ल्डकपमध्ये त्याला अजून गोल करता आला नाही.  त्यात पोर्तुगालचा संघ आज उझबेकिस्तानविरुद्ध मैदानात उतरणार आहे. पहिल्या सामन्यात DR कांगोविरुद्ध 1-1 अशी बरोबरी झाली होती. त्यामुळे  पोर्तुगालसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. तसा तो रोनाल्डोसाठी ही महत्वाचा आहे. कारण त्याला या सामन्यात एक विक्रम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. 

अमेरिकेतील टेक्सासच्या NRG स्टेडियमवर ही लढत होत आहे. या लढतीकडे संपूर्ण फुटबॉल विश्वाचे लक्ष लागले आहे. ​या स्पर्धेत जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक म्हणून  क्रिस्टियानो रोनाल्डोकडे पाहीले जाते. 41 वर्षीाच्या  रोनाल्डोला या स्पर्धेत अजून एकही गोल करता आला नाही. त्याच वेळी अर्जेंटीनाचा मेस्सी भलत्याच फॉर्ममध्ये आहे. त्याने पहिल्या सामन्यात हॅट्रीक केली. तर दुसऱ्या सामन्यात त्याची हॅट्रीक थोडक्यात हुकली. लिओनेल मेस्सी याने दोन सान्यात 5 गोल केले आहेत. त्यामुळे आजच्या सामन्यात रोनाल्डो फॉर्ममध्ये परतण्यासाठी आणि संघाला विजय मिळवून देण्यासाठी उत्सुक असेल.

Advertisement

नक्की वाचा - FIFA World Cup 2026: मैदानात इतिहास, मैदानाबाहेर छळ; इराणच्या प्रशिक्षकाने फिफाची लक्तरे वेशीवर टांगली

​आजच्या सामन्यात रोनाल्डोला इतिहास रचण्याची संधी आहे. त्याने  1 गोल केला, तरी तो पोर्तुगालच्या फुटबॉल इतिहासात आपले नाव सुवर्णअक्षरांनी कोरू शकतो. वर्ल्ड कपच्या इतिहासात पोर्तुगालसाठी सर्वाधिक गोल महान खेळाडू युसेबियो यांच्या नावावर आहेत. त्यांनी फुटबॉल वर्ल्डकपमध्ये 9 गोल केले होते. त्यांच्या या विक्रमाची तो बरोबरी करू शकतो. युसेबियो यांनी 1966 च्या वर्ल्ड कपमध्ये हे 9 गोल केले होते. तर रोनाल्डोने 2006 ते 2022 दरम्यान 8 गोल केले आहेत.

नक्की वाचा - FIFA WC 2026: 'या' संघानं तब्बल 36 वर्षांनी वर्ल्डकपमध्ये मिळवला विजय, तर ब्राझिलची पहिल्याच सामन्यात दमछाक

​हा ग्रुप K मधील सामना भारतीय वेळेनुसार रात्री 10:30 वाजता सुरू होईल. पोर्तुगालच्या संभाव्य संघात डिओगो कोस्टा, रूबेन डायस, ब्रूनो फर्नांडीस आणि राफेल लीओ यांच्यासह रोनाल्डो आघाडीवर असेल. तर उझबेकिस्तानकडून उत्किर युसुपोव आणि एल्डोर शोमुरोडोव पोर्तुगालला रोखण्याचा प्रयत्न करतील. हा सामना पोर्तुगालसाठी महत्वाचा आहे. नॉकआऊट फेरीत जाण्यासाठीपोर्तुगालला हा सामना जिंकावा लागणार आहे.