Rohit Sharma : रोहित शर्माने स्वार्थीपणे निर्णय घेतला, माजी क्रिकेटपटूचा थेट ठपका !

India vs Australia, Rohit Sharma : या सीरिजमध्ये रोहित शर्माने 6.20 च्या सरासरीने रन्स केल्या असून ऑस्ट्रेलियामध्ये खेळणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनने केलेले हे सगळ्यात कमी रन्स आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
Rohit Sharma : मेलबर्न टेस्टमधील रोहित शर्माच्या निर्णयावर टीका होत आहे. (फोटो AFP)
मुंबई:

India vs Australia : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात मेलबर्नमध्ये झालेल्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा दारूण पराभव झाला. यशस्वी जैस्वाल गळता सगळ्या भारतीय बॅटर्सची कामगिरी ही सुमार दर्जाची होती. रोहित शर्माला या सीरिजमध्ये आत्तापर्यंत एकही हाफ सेंच्युरी झळकावता आलेली नाही. त्यानं आत्तापर्यंत फक्त 31 रन्स केले आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

या सीरिजमध्ये रोहित शर्माने 6.20 च्या सरासरीने रन्स केल्या असून ऑस्ट्रेलियामध्ये खेळणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनने केलेले हे सगळ्यात कमी रन्स आहेत. रन्ससाठी झगडणाऱ्या रोहितने मेलबर्न टेस्टपूर्वी शुभमन गिलला वगळण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर केएल राहुलला सलामीला न पाठवता त्याला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी ढकलले. तो स्वत: ओपनिंगला आला.  

माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने रोहित शर्माच्या या निर्णयांवर नाराजी व्यक्त केली आहे. चोप्राने म्हटले की एम.एस.धोनी आणि विराट कोहलीने रोहित शर्मासाठी काही धाडसी निर्णय घेतले होते, जेणेकरून त्याच्या करिअरला पुन्हा उभारी मिळू शकेल. या दोघांनी रोहित शर्माला मुक्तपणे खेळता यावे यासाठी मधल्या फळीत खेळवण्याऐवजी त्याला सलामीला पाठवण्याचा निर्णय घेतला. 

( नक्की वाचा : World Record : 15 फोर आणि 11 सिक्स ! 17 वर्षांच्या मुंबईकरनं उडवली सर्व आयपीएल टीमची झोप )

धोनीने रोहितसाठी एकदिवसीय सामन्यात हा निर्णय घेतला तर कोहलीने कसोटी सामन्यांसाठी रोहितसाठी हा निर्णय घेतला होता. मात्र रोहितने कर्णधार म्हणून निर्णय घेतला तोदेखील स्वत:साठी घेतला असं आकाश चोप्राने म्हटले आहे. त्याने त्याच्या युट्युब चॅनेलवर हे मत व्यक्त केले आहे.  

Advertisement

चोप्राने म्हटले की रोहितने घेतलेला निर्णय हा त्याच्या स्वत:साठी घेतलेला निर्णय होता. गिलला टीममधून वगळणे आणि केएल राहुलला सलामीला पाठवणे हे संघाच्या हिताचे नव्हते. रोहितने स्वत:हून एक निर्णय घेतला आणि तो संघाच्या हितासाठी नव्हे तर तो स्वत:साठी घेतलेला निर्णय होता.कारण राहुल सलामीला चांगली कामगिरी करत होता, 2023मध्ये शुबमन गिलनेही चांगली कामगिरी केली होती. तो दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा बॅटर ठरला होता. शुबमनने कठीण परिस्थितीत झुंजार खेळी साकारल्या आहेत. अॅडलेडमध्येही तो चांगला खेळताना दिसला होता. मात्र त्याला संघातून वगळण्यात आले. 5 टेस्टच्या सीरिजमध्ये  भारतीय संघ पिछाडीवर असून शेवटची टेस्ट मॅच 3 जानेवारीपासून सुरू होणार आहे