Vinod Kambli : 'त्या' व्हायरल व्हिडिओनंतर विनोद कांबळी पहिल्यांदा दिसला, तब्येतीबाबत म्हणाला...

Vinod Kambli Video : टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी (Former Cricketer Vinod Kambli) चा एक व्हिडिओ सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी चांगलाच व्हायरल झाला होता

जाहिरात
Read Time: 2 mins
Vinod Kambli
मुंबई:

Vinod Kambli Video : टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी (Former Cricketer Vinod Kambli) चा एक व्हिडिओ सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी चांगलाच व्हायरल झाला होता. त्यामध्ये विनोदला चालताना त्रास होत असल्याचं स्पष्ट दिसत होतं. चालण्यासाठी इतरांची मदत घेणारा विनोद पाहून क्रिकेट फॅन्सना धक्का बसला होता. विनोदच्या तब्येतीबाबत काळजी व्यक्त केली जात होती. या व्हायरल व्हिडिओनंतर विनोद कांबळी एका व्हिडिओमध्ये दिसला आहे. त्यामध्ये त्यानं त्याच्या प्रकृतीबाबत स्पष्टीकरण दिलंय. 

काय होता Viral Video ?

विनोद कांबळीचा यापूर्वीचा व्हिडिओ नरेंद्र गुप्ता यानं शेअर केला होता. 'विनोद कांबळीची प्रकृती खालावली आहे. त्याला हार्ट आणि डिप्रेशनसह अनेक आरोग्यांचा समस्यांमुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मला खात्री आहे की तो लवकरच ठीक होईल. त्याचबरोबर त्याला मदत मिळेल. या मदतीची विनोदला गरज आहे,' असं या व्हिडिओमध्ये स्पष्ट करण्यात आलं होतं. 


विनोद कांबळीचा नवा व्हिडिओ

विनोद कांबळीचा हा व्हिडिओ पाहून रिकी आणि मार्कस कौटो हे त्याचे शालेय मित्र कांबळीला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेले. त्यावेळी त्यांना सुखद धक्का बसला. विनोद कांबळी धडधाकट असून त्यानं त्यांचं स्वागत केलं. तसंच जुन्या आठवणींना उजाळा दिला. रामेश्वर सिंह (@@RSingh6969a) यांनी हा व्हिडिओ सोशल मीडिया नेटवर्क X वर याबबतची पोस्ट केली आहे. त्यांनी यामध्ये विनोदचा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे.

Advertisement

( नक्की वाचा : बाबर आझमच्या पोस्टनं पाकिस्तानात गोंधळ, Arshad Nadeem चं अभिनंदन आलं अंगाशी )
 

मी एकदम फिट असून आजही तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंग करु शकतो. त्याचबरोबर स्पिनर्सचे बॉल मैदानाच्या बाहेर भिरकावून देऊ शकतो, असं विनोदनं या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. हा व्हिडिओ पाहून विनोदच्या फॅन्सनी आनंद व्यक्त केला आहे.

Advertisement

सचिनचा जवळचा मित्र

टीम इंडियाचा धडाकेबाज खेळाडू अशी विनोद कांबळीची ऐकेकाळी ओळख होती. पण, तो खराब फॉर्म आणि बेशिस्त वर्तणुकीमुळे टीम इंडियाच्या बाहेर गेला. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विनोद जवळचा मित्र होता. दोघांनीही एकाच काळात मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये क्रिकेटचा श्रीगणेशा केला. विनोदनं त्याच्या आर्थिक तंगीला सचिनला दोषी ठरवलं त्यावेळी सचिननं त्याच्याशी बोलणं बंद केलं होतं. नंतर विनोदनं या प्रकाराबद्दल सचिनची माफी मागितली. त्यानंतर दोघांचे मतभेद दूर झाले. 
 

Topics mentioned in this article