Ranji Trophy : अपमान सोसला, आरोप झेलले पण हार मानली नाही; अजय शर्माच्या एका जिद्दीने जम्मू काश्मीर चॅम्पियन

How Ajay Sharma Transformed Jammu & Kashmir into Ranji Trophy Champions: मॅच फिक्सिंगच्या आरोपांतून कोर्टाची प्रदीर्घ लढाई जिंकल्यानंतर, अजय शर्माने जम्मू-काश्मीर क्रिकेटचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलून टाकला.

जाहिरात
Read Time: 3 mins
Ajay Sharma : . कल्याणीच्या मैदानावर "भाइयों में भाई कैसा हो, अज्जू भाई जैसा हो" अशा घोषणा घुमत होत्या.
मुंबई:

How Ajay Sharma Transformed Jammu & Kashmir into Ranji Trophy Champions: जम्मू-काश्मीरच्या क्रिकेट संघाने कर्नाटकसारख्या दिग्गज संघाला त्यांच्याच घरच्या मैदानावर म्हणजेच केएससीए ग्राऊंडवर धूळ चारली आणि पहिल्यांदा रणजी ट्रॉफीवर आपले नाव कोरले. या ऐतिहासिक विजयाचा हिरो आकिब नबी ठरला असला, तरी या यशाच्या पडद्यामागे एक असा चेहरा आहे, ज्याची ओळख रणजी क्रिकेटचा राजा अशी होती. या राजाचे नाव आहे, अजय शर्मा. जम्मू काश्मीरच्या ऐतिहासिक विजेतेपदाचा तो पडद्यामागचा शिल्पकार आहे. 

मॅच फिक्सिंगच्या आरोपांतून कोर्टाची प्रदीर्घ लढाई जिंकल्यानंतर, अजय शर्माने जम्मू-काश्मीर क्रिकेटचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलून टाकला आहे. अजयनं 2022 मध्ये  या संघाची जबाबदारी स्वीकारली, तेव्हा कोणालाही वाटले नव्हते की हा संघ एक दिवस चॅम्पियन बनेल.

जम्मू-काश्मीरने बंगालला 6 विकेट्सनं पराभूत करत पहिल्यांदा रणजी फायनल गाठली, तेव्हा मैदानात खेळाडूंनी अजय शर्मा यांना आपल्या खांद्यावर उचलून घेतले होते. कल्याणीच्या मैदानावर "भाइयों में भाई कैसा हो, अज्जू भाई जैसा हो" अशा घोषणा घुमत होत्या. हा तोच क्षण होता जेव्हा एका प्रशिक्षकाच्या कडक शिस्तीचे फळ संपूर्ण राज्याला मिळाले होते. 

( नक्की वाचा : Ranji Trophy Final: जम्मू-काश्मीरने इतिहास घडवला! कर्नाटकचा पराभव करत पहिल्यांदाच बनले रणजी ट्रॉफीचे राजे )

अजय शर्मा हा दिल्लीचा माजी क्रिकेटपटू असून रणजी ट्रॉफीमध्ये त्याचा दबदबा राहिला आहे. त्यांच्या नावावर 129 फर्स्ट क्लास मॅचेसमध्ये तब्बल 38 सेंच्युरी आणि 36 हाफ सेंच्युरी आहेत. त्याने  67.46 च्या सरासरीने 10120 रन केले आहेत.त्याने 1 टेस्ट आणि 31 वनडे मॅचेसमध्ये टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं आहे.

Advertisement

थायलंडमधील त्या फोन कॉलने बदललं नशीब

अजय शर्मा 2022 मध्ये त्याच्या कुटुंबासोबत थायलंडमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत होता. त्यावेळी त्यांना मिथुन मन्हास यांचा फोन आला, जे तेव्हा जम्मू-काश्मीर क्रिकेटच्या विकासाचे प्रमुख होते. शर्माने दिल्लीच्या ज्युनियर टीम्सना कोचिंग दिले होते आणि यश ढुलसारख्या खेळाडूला घडवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. 

खरं तर त्याला दिल्लीच्या सीनियर टीमचा कोच बनायचे होते, पण तिथे संधी मिळत नसल्याने त्यांनी जम्मू-काश्मीरचा प्रस्ताव स्वीकारला. कोर्टाच्या प्रकरणातून निर्दोष सुटूनही दिल्लीत त्यांना डावलले जात होते, म्हणूनच त्यांनी एका नव्या आव्हानाला होकार दिला.

Advertisement

टीममधील 'स्टार कल्चर' केलं खल्लास

अजय शर्मा यांनी जम्मू-काश्मीरमध्ये पाय ठेवताच तिथले चित्र पाहिले. टीममध्ये 'स्टार कल्चर' मोठ्या प्रमाणावर होते. त्यांनी स्पष्ट केले की इथे कोणीही स्टार नाही, जो परफॉर्म करेल तोच खेळेल. याच कडक भूमिकेमुळे त्यांनी अब्दुल समदसारख्या खेळाडूलाही एक महिन्यासाठी टीममधून बाहेर केले होते. खेळाडूंना अजय यांची ही पद्धत आवडली नाही. काही खेळाडूंनी तर समितीला पत्र लिहून तक्रार केली की आमचा कोच 'तानाशाह' म्हणजेच हुकूमशहा आहे. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून समितीने त्यांना थोडे नरम वागण्याचा सल्ला दिला.

जेव्हा खेळाडूंना समजली 'गुरु'ची खरी ताकद

अजय शर्मा सांगतो की, सुरुवातीला खेळाडू स्वतःला आयपीएलचे नेट बॉलर समजण्यातच धन्यता मानत होते. त्यांची मानसिकता फक्त टिकून राहण्याची होती, जिंकण्याची नव्हती. पण एका घटनेने सर्व काही बदलले. एकदा मुंबई एअरपोर्टवर भारताचा माजी फास्ट बॉलर एल. बालाजी याने अजय शर्मा यांना पाहिले आणि धावत जाऊन त्यांना मिठी मारली.

Advertisement

बालाजीने त्याला "शतकांचा शहंशाह" म्हणून हाक मारली. हे पाहून टीममधील खेळाडू चकित झाले. त्यांनी लगेच गुगलवर अजय शर्मा यांचे रेकॉर्ड्स शोधले आणि त्यांना समजले की आपल्याला शिकवणारा माणूस नेमका कोण आहे. त्यानंतर खेळाडूंचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला आणि आज त्याच टीमनं इतिहास रचला आहे.
 

Topics mentioned in this article