Video : मुलीनं शेजारी बसलेल्या पोराच्या सपासप 3 थप्पड मारल्या, IND vs WI सामन्यादरम्यान नको तेच सुरु होतं..

Ind vs WI Test Match : स्टेडियममध्ये सामना सुरु असताना एका तरुणीने शेजारी बसलेल्या तरुणाच्या एक दोन नव्हे, तर तीनवेळा कानाखाली मारल्या. हा संपूर्ण प्रकार कॅमेरात कैद झाला असून व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins
Woman Slapped A Man Viral Video
मुंबई:

Girl Slaps A Boy Viral Video, Ind vs WI Test Match : दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये भारत विरुद्ध वेस्टइंडिज दुसऱ्या टेस्ट मॅचचा थरार सुरु आहे. आज चौथ्या दिवशी भारताने 1 विकेट गमावून 63 धावांपर्यंत मजल मारली आहे. पहिल्या डावात भारताने 518 धावांचा डोंगर रचला होता. तर वेस्टइंडिजने पहिल्या डावात 248 तर दुसऱ्या डावात सर्वबाद 390 धावा केल्या. त्यामुळे उद्या पाचव्या दिवशी भारताला विजयासाठी फक्त 58 धावांची आवश्यकता असणार आहे. सामन्याची रंगत सुरू असतानाच सोशल मीडियावर एका तरुण-तरुणीचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल झाला आहे. स्टेडियममध्ये सामना सुरु असताना एका तरुणीने शेजारी बसलेल्या तरुणाच्या एक दोन नव्हे, तर तीनवेळा कानाखाली मारल्या. हा संपूर्ण प्रकार कॅमेरात कैद झाला असून व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. 

@gharkekalesh नावाच्या यूजरने हा व्हिडीओ ट्वीटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओत पाहू शकता की, तरुण-तरुणी स्टेडियममध्ये भारत-वेस्टइंडिजचा कसोटी सामना पाहत असतात. पण या सामन्यादरम्यान या तरुणीने मोठा सीनच क्रिएट केला. तिने शेजारी बसलेल्या या पोराच्या सटासट कानशिलात लगावल्या. दोघांचीही मस्ती सुरु असताना अचानक त्यांच्यासमोर कॅमेरा येतो आणि हा विचित्र प्रकार व्हिडीओत कैद होतो. तरुणीने या तरुणाच्या कानाखाली मारल्यानंतर ती त्याची मानसुद्धा धरते. तरुणाला मारहाण करताना ती त्याच्यासोबत हसत असते. म्हणजेच या दोघांमध्ये गंभीर वाद झाला नाही, हे या व्हिडीओवरून स्पष्ट होतं. दोघांचाही व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला असून यूजर्सने या व्हिडीओ वेगवेगळ्या प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे.

इथे पाहा तरुण-तरुणीचा व्हायरल व्हिडीओ

सामन्याबाबत सविस्तर माहिती अशी की, दुसऱ्या इनिंगमध्ये भारतासाठी मैदानात उतरलेला सलामीचा फलंदाज यशस्वी जैस्वालला आज धावांचा सूर गवसला नाही. वॅरीकॅनच्या गोलंदाजीवर यशस्वी फक्त 8 धावांवर झेलबाद झाला. अँडरसन फिलिपने यशस्वीचा झेल टीपला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या के एल राहुलने दिवसअखेर 54 चेंडूत 25 धावांची नाबाद खेळी केली आहे. या इनिंगमध्ये दोन चौकारांचा समावेश आहे. तर साई सुदर्शनने 47 चेंडूत 30 नाबाद धावा केल्या आहेत. त्याच्या इनिंगमध्ये 5 चौकारांचा समावेश आहे.