Yograj Singh's controversial statement on Kapil Dev : टीम इंडियाच्या महान ऑल राऊंडरमध्ये युवराज सिंहचा (Yuvraj Singh) समावेश होतो. 2007 साली झालेल्या T20 वर्ल्ड कप आणि 2011 मधील वन-डे वर्ल्ड कप विजेतेपदात युवराजचा मोठा वाटा होता. युवराजनं 2019 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. युवराज निवृत्तीनंतर जितका चर्चेत नसतो तितके त्याचे वडील आणि माजी भारतीय क्रिकेटपटू योगराज सिंह चर्चेत असतात.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कपिलला गोळी मारणार होते
योगराज सिंह यांनी यूट्यूब चैनल 'अनफिल्टर्ड बाय समदिश' ला नुकतीच मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये महान क्रिकेटपटू आणि वर्ल्ड कप विजेत्या भारतीय टीमचे कॅप्टन कपिल देव यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. आपण कपिल देवला गोळी घालण्यासाठी त्याच्या घरी पोहोचलो होतो, असं योगराज यांनी सांगितलं.
योगराज सिंह यांनी सांगितलं, 'जेव्हा कपिल देव भारत, नॉर्थ झोन आणि हरियाणा टीमचा कॅप्टन बनला, त्यावेळी त्यानं मला काहीही कारण नसताना सर्व टीममधून काढून टाकलं. कपिलला याबाबत प्रश्न विचारावा अशी माझ्या बायकोची (युवराजची आई) इच्छा होती. त्यावर मी या खुनी व्यक्तीला धडा शिकवेन असं तिला सांगितलं.
( नक्की वाचा : 'जग तुझ्यावर थुंकेल', कपिल देवबद्दल काय म्हणाले युवराजचे वडील? )
मी माझी पिस्तूल काढली आणि सेक्टर 9 मधील कपिलच्या घरी गेलो. कपिल देव त्याच्या आईसोबत बाहेर आला. मी त्याला डझनभर शिव्या दिल्या. मी त्याला सांगितलं की तुझ्यामुळे मी माझा एक मित्र गमावलाय. तू जे केलं आहेस, त्याची किंमत तुला चुकवावी लागेल.
मी त्याला (कपिल देव) सांगितलं की मला तुझ्या डोक्यात गोळी घालायची आहे, पण मी तसं करणार नाही. कारण, तुझ्या बाजूला तुझी पवित्र आई उभी आहे. मी त्यानंतर शबनमला (युवराजची आई) इथून चल असं सांगितलं. त्याच क्षणी मी कधीही क्रिकेट खेळणार नाही. युवराज क्रिकेट खेळेल, असं ठरवलं' असं योगराज सिंह म्हणाले.
( नक्की वाचा : गौतम गंभीर खोटारडा, गंभीरच्या KKR मधील सहकाऱ्यानंच केला मोठा आरोप )
काय आहे रागाचं कारण?
योगराज सिंह यांचं हे वाक्य क्रिकेकटपटू सोडा सामान्य नागरिकांनाही शोभत नाही. ते कसली खुन्नस काढतायत? त्यांना कशाचा राग आहे? ते कपिल देव यांच्याबद्दल सतत या पद्धतीचं वक्तव्य का करतात? हे प्रश्न तुम्हाला पडले असतील. या प्रश्नाचं उत्तर त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये आहे.
योगराज यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट फार खेळता आलं नाही याचा राग आहे. त्यांनी अवघ्या 1 टेस्ट आणि 6 वन-डे मध्ये भारतीय टीमचं प्रतिनिधित्व केलं. ते 21 ते 25 फेब्रुवारी 1981 दरम्यान न्यूझीलंडविरुद्ध एकमेव टेस्ट खेळले. त्यानंतर त्यांना कधीही टेस्ट क्रिकेटमध्ये संधी मिळाली नाही. त्या टेस्टमध्ये 10 रन आणि 1 विकेट अशी त्यांची कामगिरी होती. तर त्यांनी 6 वन-डेमध्ये 4 रन आणि 1 विकेट घेतली आहे.
योगराज यांची देशांतर्गत क्रिकेटमधील कारकिर्दही फारशी लांबली नाही. त्यांनी 30 फर्स्ट क्लास क्रिकेट मॅचमध्ये 398 रन आणि 66 विकेट घेतल्या होत्या. तर 13 लिस्ट A मॅचमध्ये 39 रन आणि 14 विकेट्स अशी त्यांची कामगिरी होती.
युवराजनंही दिलं होतं स्पष्टीकरण
योगराज यांचा मुलगा आणि भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंहनंही याबाबत एकदा स्पष्टीकरण दिलं होतं. 'माझ्या वडिलांना मानसिक समस्या आहे. ते याचा स्वीकार करतील किंवा करणार नाहीत,' असं युवराजनं एका पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं होतं.