Fakhar Zaman, Pakistan vs New Zealand, 1st Match: गेल्या अनेक दिवसांपासून क्रिकेट फॅन्स प्रतीक्षा अखेर संपली आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीला आज (19 फेब्रुवारी 2025) सुरुवात झाली. पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पहिला सामना कराचीमधील नॅशनल बँक स्टेडियमवर होत आहे. पहिल्यात मॅचमध्ये यजमान पाकिस्तानसाठी एक वाईट घटना घडली आहे.
पाकिस्तानचा प्रमुख बॅटर फखर झमान मॅचमधील दुसऱ्याच बॉलवर जखमी झाला. फखरचा दुखापतग्रस्त सईम अयूबच्या जागी टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. पण, तो देखील पहिल्या मॅचमध्ये जखमी झाला. फखरवर सुरुवातीला मैदानातच उपचार करण्यात आले. पण, त्याचा काही फायदा झाला नाही. त्यानंतर त्याला मैदानाच्या बाहेर जावं लागलं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कसा झाला जखमी?
पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदी पहिली ओव्हर टाकत होता. या ओव्हरचा दुसरा बॉल ओपनर विल यंगनं मिड ऑफच्या दिशेनं टोलावला. ब्राऊंड्री लाईनच्या दिशेनं जाणारा तो बॉल अडवण्याच्या प्रयत्नात फखर झमान जखमी झाला.
( नक्की वाचा : Champions Trophy : 29 वर्षांनी होणाऱ्या स्पर्धेचा पहिल्याच दिवशी फ्लॉप शो, पाकिस्तानात काय चाललंय? )
फखरनं दूरवरुन पळत येत बॉल अडवण्याचा प्रयत्न केला. त्यानं स्लाईड करत बॉलतर थांबवला. पण, तो दुखापत टाळू शकला नाही. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ वेगानं व्हायरल होत आहे. त्यामध्ये दुखापत झाल्यानंतर बाऊंड्री लाईनच्या बाहेर डोकं खाली करुन बसलेला फखर दिसत आहे.
2017 मधील विजेतेपदात महत्त्वाची भूमिका
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा यापूर्वीचा सिझन 2017 साली झाला होता. त्या सिझनमधील फायनलमध्ये फखरनं भारताविरुद्ध सेंच्युरी झळकावली होती. फखरनं त्या मॅचमध्ये 106 बॉलमध्ये 114 रन करत पाकिस्तानच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
इंग्लंडमधील ओव्हरच्या मैदानवर झालेल्या त्या मॅचमध्ये पाकिस्ताननं फखरच्या सेंच्युरीमुळे 4 आऊट 338 रन केले होते. त्याला उत्तर देताना टीम इंडिया 158 रन्सवरच ऑल आऊट झाली. त्यामुळे पाकिस्ताननं तो सामना 180 रन्सच्या मोठ्या फरकानं जिंकला होता.