Ind Vs Aus 3rd Test: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सुरु झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला आहे. सकाळी सामन्याला सुरुवात झाल्यापासून याठिकाणी पावसाने हजेरी लावली होती. पाऊस आणि ओल्या खेळपट्टीमुळे अखेर सामना थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. सामन्याच्या पहिल्या दिवशी फक्त 13.2 षटकांचाच खेळ झाला असून यामध्ये ऑस्ट्रेलियाने एकही विकेट न गमावता 28 धावा केल्यात.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामधील तिसऱ्या कसोटी सामन्याला 14 डिसेंबरपासून ब्रिस्बेन येथ सुरु झाली. मात्र सामन्याच्या पहिल्या दिवशी पावसाने खोळंबा केला. त्यामुळे केवळ 13.2 षटकेच खेळता आली. आजच्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने एकही विकेट न गमावता 28 धावा केल्या होत्या. त्यापैकी उस्मान ख्वाजाने 19 धावा केल्या असून नॅथन मॅकस्वीनी 4 धावा केल्यानंतर त्याच्यासोबत खेळत आहे. भारताकडून जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि आकाशदीप यांनी नव्या चेंडूवर चांगली गोलंदाजी केली, पण त्यांना एकही बळी घेता आला नाही.
तिसऱ्या कसोटीच्या पहिला दिवस आणि पहिल्या सत्रात पावसाने व्यत्यय आणला होता. यावेळी सुमारे 10 मिनिटांनी सामना सुरू झाला. मात्र दुसऱ्यांदा पाऊस आल्याने तो थांबण्याची चिन्हे दिसत नव्हती. ब्रिस्बेनमध्ये मुसळधार पावसामुळे गब्बा मैदान पाण्याने भिजले होते. मैदान ओले असल्याने दुसरे सत्र रद्द करण्यात आले. त्यानंतरही भारतीय भारतीय वेळेनुसार रात्री 12 वाजण्याच्या सुमारास पहिल्या दिवसाचा खेळ रद्द झाल्याचे घोषित करण्यात आले.
(नक्की वाचा- अजित पवारांच्या गाडीचं सारथ्य करणारी महिला कॉन्स्टेबल अटकेत, भोंदू बाबाच्या टोळीशी कनेक्शन उघड)