Ind Vs Aus: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामधील पाचव्या कसोटी सामन्याला आजपासून सुरुवात झाली. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळल्या जात असलेल्या या कसोटीमध्ये भारतीय संघाचा पहिला डाव अवघ्या 185 धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा भेदक मारा अन् टीम इंडियाच्या आघाडीच्या फलंदाजांनी निराश केल्याने टीम इंडियाचा डाव गडगडला.
सिडन्नी येथे खेळल्या जात असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 च्या पाचव्या कसोटीच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी कहर केला. शुक्रवारी (03 जानेवारी) सुरू झालेल्या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना बुमराहच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया अवघ्या 185 धावांत गारद झाली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून स्कॉट बोलंडने सर्वाधिक 4 बळी घेतले. तर भारताकडून पंतने 40 धावांची सर्वात मोठी खेळी खेळली. त्याशिवाय रवींद्र जडेजा 26, कर्णधार जसप्रीत बुमराह 22 धावा, शुभमन गिल 20 धावा, विराट कोहली 17 धावा आणि मागच्या कसोटीत चमकदार कामगिरी केलेला यशस्वी जैस्वाल अवघ्या 10 धावा करू शकला. याशिवाय इतर फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही.
सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज स्कॉट बोलंड जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. त्याने डावाच्या 57 व्या षटकात 40 धावांवर ऋषभ पंतला पॅव्हेलियनमध्ये पाठवले, त्यानंतर नितीश कुमार रेड्डीला गोल्डन डकचा बळी बनवले. भारताने 57 षटकात 6 गडी गमावून 120 धावा केल्या आहेत. बोलंडने या सामन्यात चार बूळी घेतले.
दरम्यान, अखेरच्या टप्प्यात शुबमन गिल याने 64 चेंडूत 20 धावा केल्या. तर कर्णधार बुमराहने 3 चौकार आणि 1 षटकारासह 17 बॉलमध्ये 22 धावा कुटल्या, ज्यामुळे टीम इंडियाला 150 पर्यंतचा टप्पा पार केला.