India vs England, Lords Test : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरी टेस्ट गुरुवारपासून (10 जुलै 2025) ऐतिहासिक लॉर्ड्स स्टेडियमवर सुरु होणार आहे. या सीरिजमध्ये लीड्सला झालेली पहिली टेस्ट इंग्लंडनं जिंकली होती. त्यानंतर टीम इंडियानं एजबस्टनमध्ये दमदार विजय मिळवत मालिकेत कमबॅक केलं. भारतीय टीमनं एजबस्टनमध्ये पहिल्यांदाच टेस्ट मॅच जिंकलीय. त्यामुळे यजमान टीमवर दबाव वाढलाय. आता लॉर्ड्स टेस्ट जिंकण्यासाठी इंग्लंडनं मोठा डाव खेळलाय. त्यांनी गेल्या चार वर्षांपासून टेस्ट क्रिकेटपासून दूर असलेल्या धोकादायक खेळाडूचा प्लेईंग 11 मध्ये समावेश केला आहे.
गुरुवारपासून लॉर्ड्सवर भारताविरुद्ध सुरू होणाऱ्या तिसऱ्या टेस्टच्या एक दिवस आधीच इंग्लंडनं प्लेईंग 11 जाहीर केलीय. या टेस्टसाठी फास्ट बॉलर जोफ्रा आर्चरचा (Jofra Archer) प्लेईंग 11 मध्ये समावेश केला आहे. आर्चर गेल्या काही वर्षांपासून अनेक दुखापतींनी त्रस्त होता. त्याचा जोश टंगच्या जागी टीममध्ये समावेश करण्यात आलाय.
( नक्की वाचा : IND vs ENG: लॉर्ड्स टेस्टमध्ये इतिहास घडणार! 4 भारतीय खेळाडूंची महारेकॉर्डवर नजर )
आर्चर यापूर्वी फेब्रुवारी 2021 मध्ये शेवटची टेस्ट मॅच खेळला होता. त्यानंतर कोपर आणि पाठीच्या दुखापतींमुळे तो स्पर्धात्मक क्रिकेटपासून बराच काळ दूर होता. तसंच या कालावधीमध्ये त्यानं फक्त मर्यादीत ओव्हर्सचे क्रिकेट सामने खेळले आहेत. या आयपीएलमध्ये तो राजस्थान रॉयल्सकडून खेळला होता.
जोफ्रा आर्चरनं 2019 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्यानं 13 टेस्टमध्ये 31.04 च्या सरासरीनं 42 विकेट्स घेतल्या आहेत.
इंग्लंडची प्लेईंग 11 : झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कॅप्टन), जेमी स्मिथ (विकेटकिपर), ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, शोएब बशीर.