Shubman Gill: टीम इंडियाच्या कॅप्टनचा डबल धमाका, इंग्लंडच नाही तर SENA देशात रचला इतिहास!

Shubman Gill Double Century : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात बर्मिंगहॅममध्ये सुरु असलेली दुसरी टेस्ट शुबमन गिलनं गाजवली आहे

जाहिरात
Read Time: 2 mins
Shubman Gill: टीम इंडियाचा कॅप्टन शुबमन गिलनं इतिहास रचला आहे. (फोटो - BCCI/X)
मुंबई:

Shubman Gill Double Century : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात बर्मिंगहॅममध्ये सुरु असलेली दुसरी टेस्ट शुबमन गिलनं गाजवली आहे. गिलनं या टेस्टमध्ये डबल सेंच्युरी झळकावली आहे. इंग्लंडमध्ये डबल सेंच्युरी करणारा गिल हा तिसरा भारतीय आहे. तसंच दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रिया या देशात सर्वाधिक वैयक्तिक रन्स करणारा तो आशियाई कॅप्टन बनला आहे. 

गिलनं गाजवला दिवस

शुबमन गिलचा हा टेस्ट करियरमधील सर्वोच्च स्कोअर आहे. त्याचबरोबर टेस्ट कारकिर्दीमधील त्याची ही पहिलीच डबल सेंच्युरी आहे. यापूर्वी लीड्स टेस्टमधील पहिल्या इनिंगमध्ये त्यानं सेंच्युरी झळकावली होती. तोच फॉर्म त्यानं एजबस्टनमध्येही कायम ठेवला आहे. 

गिलनं पहिल्या दिवशी इंग्लंडच्या बॉलर्सना कोणतीही दाद न देता सेंच्युरी झळकावली होती. तो पहिल्या दिवसाच्या अखेरीस 216 बॉल्सचा सामना करत 52.77 च्या स्ट्राईक रेटनं नाबाद 114 रन्स काढले होते. त्याच्या सेंच्युरीमुळे टीम इंडियानं पहिल्या दिवशी समाधानकारक स्कोअर केला होता.

एजबस्टन टेस्टच्या दुसऱ्या दिवशी देखील तो फॉर्म कायम राखत डबल सेंच्युरी केली आहे. गिलनं 311 बॉल्समध्ये 21 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीनं ही डबल सेंच्युरी पूर्ण केली. इंग्लंडमध्ये डबल सेंच्युरी करणारा गिल हा तिसरा भारतीय आहे. यापूर्वी सुनील गावस्कर आणि राहुल द्रविड या दिग्गजांनी हा पराक्रम केला. त्याचबरोबर शुबमन गिल हा इंग्लंडमध्ये डबल सेंच्युरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन आहे.

Advertisement

शुबमन गिलला रविंद्र जडेजानं चांगली साथ दिली. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 279 बॉलमध्ये 203 रन्सची पार्टरनशिप केली. पहिल्या दिवसाचं शेवटचं सेशन आणि दुसऱ्या दिवसाचं पहिलं सेशन या जोडीनं खेळून काढलं. जडेजाला सेंच्युरी काही झळकावता आली नाही. त्यानं 137 बॉल्समध्ये 89 रन्स केले.

( नक्की वाचा: Rishabh Pant : '.... तर ऋषभ पंतचा जीवही जाऊ शकतो!', पंतवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा गंभीर इशारा )
 

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात पाच टेस्टची सीरिज सध्या सुरु आहे. या सीरिजमध्ये यजमान इंग्लंड सध्या 1-0 नं आघाडीवर आहे. इंग्लंडनं लीड्समध्ये झालेली पहिली टेस्ट पाच विकेट्सनं जिंकली होती. 

Advertisement

शुबनमन गिल टेस्ट टीमचा कॅप्टन झाल्यापासून ही पहिलीच सीरिज आहे. या सीरिजमध्ये एक बॅटर म्हणून त्यानं दमदार सुरुवात केली आहे. 
 

Topics mentioned in this article