IND vs ENG : हॅरी ब्रुकला बॉलिंग देण्याचा रडीचा डाव का खेळला? बेन स्टोक्सनं सांगितलं कारण

India vs England 4th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीमधील चौथ्या टेस्टला अनपेक्षित कलाटणी मिळाली.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

India vs England 4th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीमधील चौथ्या टेस्टला अनपेक्षित कलाटणी मिळाली. इंग्लंडचा कॅप्टन बेन स्टोक्सने सामन्याच्या अंतिम सत्राच्या सुरुवातीला सामना ड्रॉ करण्याच्या प्रस्ताव ठेवला. त्यावेळी खेळत असलेले भारतीय बॅटर रविंद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी त्याला साफ नकार दिला. टेस्ट क्रिकेटच्या नियमानुसार, दोन्ही कॅप्टन्सना सामन्याचा निकाल लागणे अशक्य वाटत असेल, तर ते आपसात सहमतीने सामना ड्रॉ करू शकतात.

नेमकं काय घडलं?

सामना ड्रॉ करण्यासाठी अथक प्रयत्न केल्यानंतर, जडेजा 89 धावांवर आणि सुंदर 80 धावांवर बॅटिंग करत असताना त्यांनी स्टोक्सचा प्रस्ताव नाकारला. त्यानंतर  इंग्लंडचा कॅप्टन चांगलाच संतापला.  सेंच्युरीच्या जवळ असल्यानं दोन्ही बॅटर्सनं बॅटिंग सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला. 

( नक्की वाचा : Asia Cup 2025: पहलगाम हल्ल्यानंतरही टीम इंडिया पाकिस्तानशी खेळणार! वाचा कधी आणि कुठं होणार सामना? )
 

बेन स्टोक्स काहीतरी बोलल्यानंतर, जॅक क्रॉली आणि बेन डकेट यांनाही भारत खेळणे का सुरू ठेवू इच्छितो, असे विचारताना दिले. स्टोक्सने उपहासाने विचारले, "तुम्हाला हॅरी ब्रूकविरुद्ध सेंच्युरी पूर्ण करायचे आहे का?" यावर जडेजाने फक्त "मी काही करू शकत नाही" असे उत्तर दिले.

यावेळी जडेजाने हसून आपली शालीनता कायम ठेवली. नियमांनुसारही भारताला बॅटिंग सुरू ठेवण्याचा पूर्ण अधिकार होता. यानंतर स्टोक्सने निषेध म्हणून हॅरी ब्रूकला गोलंदाजी दिली आणि जडेजाने त्याच्यावर षटकार ठोकून आपले पाचवे कसोटी शतक पूर्ण केले. या दरम्यान, इंग्लंडच्या खेळाडूंनी खराब खेळाडूवृत्ती दाखवत जडेजा आणि सुंदरला सोपे आणि शॉर्ट चेंडू टाकायला सुरुवात केली.

Advertisement

स्टेक्स काय म्हणाला?

सामन्यानंतरही स्टोक्सला याबद्दल विचारण्यात आले. यावर स्टोक्स म्हणाला, "मला वाटते की सर्व मेहनत भारताने केली होती. ते दोघे (वॉशिंग्टन आणि जडेजा) अविश्वसनीयपणे चांगले खेळले आणि ती वेळ अशी होती जिथे स्पष्टपणे एकच निकाल होता आणि माझ्या कोणत्याही फास्ट बॉलरवर दुखापत होण्याची शक्यता नव्हती, कारण अजून एक सामना बाकी आहे."

स्टोक्स पुढे म्हणाला, "डॉसी (डॉसन) या सामन्यात इतके ओव्हर्स टाकले होते की त्याचे शरीर थोडे थकले होते आणि पायांमध्ये गोळे येत होते, त्यामुळे मी त्या शेवटच्या अर्ध्या तासासाठी माझ्या कोणत्याही आघाडीच्या गोलंदाजाला धोका पत्करणार नव्हतो." विशेष म्हणजे, स्टोक्सने हॅरी ब्रूकला चेंडू देण्याच्या निर्णयाबद्दल गावस्कर यांच्यासह अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी उघडपणे स्टोक्सवर टीका केली.
 

Advertisement
Topics mentioned in this article