India vs NZ 3rd Test : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तिसरी टेस्ट मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरु आहे. या टेस्टच्या पहिल्या दिवशी रविंद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या भेदक माऱ्यामुळे न्यूझीलंडची पहिली इनिंग 235 रनवर संपुष्टात आली. न्यूझीलंडची बॅटिंग सुरु असताना मैदानात काही काळ मैदानात तणाव निर्माण झाला होता. मुंबईकर तरुण क्रिकेटपटू सर्फराज खानला अंपायरनी वॉर्निंग दिली. त्यावेळी कॅप्टन रोहित शर्मानं मध्यस्थी करत प्रकरण शांत केलं.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नेमकं काय घडलं?
न्यूझीलंडच्या इनिंगमधील 31 व्या ओव्हर संपल्यानंतर हा प्रकार घडला. त्यावेळी मैदानातील अंपायर रिचर्ड इलिंगवर्थ यांनी रोहित शर्माला बोलावलं. सर्फराज खान त्याच्या बडबडीमुळे सतत त्रास देत आहे. न्यूझीलंडचा बॅटर डॅरिल मिचेलनं याची तक्रार केल्याचं त्यांनी सांगितलं. त्यावेळी रोहितनं मध्यस्थी करत सर्फराजला समजावलं. त्यानं मिचेलशी देखील चर्चा केली. त्यामुळे हा मुद्दा जास्त तापला नाही.
का केली होती तक्रार?
या संपूर्ण प्रकरणाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यानुसार शॉर्ट लेग/सिली पॉईंटवर फिल्डिंग करत असलेला सर्फराज सतत बडबड करुन मिचेलला त्रास देत आहे. त्या त्रासाला कंटाळून मिचेलनं मैदानातील अंपायरकडं त्याची तक्रार केली.
न्यूझीलंडची इनिंग गडगडली
मुंबई टेस्टच्या पहिल्या दिवशी न्यूझीलंडची इनिंग 235 रनवर संपुष्टात आली. न्यूझीलंडची अवस्था 3 आऊट 159 अशी भक्कम होती. पण, त्यानंतर रविंद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदरच्या स्पिन बॉलिंगपुढे त्यांची इनिंग 235 रनवर संपुष्टात आली. जडेजानं 5 तर सुंदरनं 4 विकेट्स घेतल्या.
( नक्की वाचा : 'भैय्या, मी सांगतोय ना...' विराट, पंत तयार नव्हते, पण सर्फराजनं केला आग्रह, आणि... Video )
न्यूझीलंडकडून सर्फराज खानची अंपायरकडं तक्रार करणाऱ्या डॅरिल मिचेलनं सर्वाधिक 82 रन केले. तर विल यंगनं 71 रन काढले. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 87 रनची पार्टनरशिप केली. पण, ही जोडी फुटल्यानंतर न्यूझीलंडची इनिंग गडगडली. तीन टेस्टच्या या सीरिजमध्ये न्यूझीलंडनं यापूर्वीच 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.