India Vs Pakistan Playing 11: क्रिकेटच्या मैदानावर एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील हायहोल्टेज लढत रविवारी होणार आहे. 23 फेब्रुवारी रोजी दुबईच्या मैदानावर दोन्ही संघ आमने-सामने येतील. या हायहोल्टेज लढतीकडे संपूर्ण क्रिडाविश्वाचं लक्ष लागले आहे. पाकिस्तानला धुळ चारण्यासाठी कशी कसेल भारताची प्लेईंग 11 आणि रणनिती तसेच कुठे पाहाल हा सामना? जाणून घ्या सविस्तर...
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाच्या फलंदाजीबद्दल बोलायचे झाल्यास, कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल डावाची सुरुवात करतील. गिलने बांगलादेशविरुद्ध नाबाद शतक झळकावले होते आणि रोहितने 41 धावांची शानदार खेळी केली होती. त्यामुळे या सामन्यातही ते मोठी खेळी करतील. पाकिस्तानविरुद्धची आकडेवारी उत्कृष्ट असल्याने विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर येईल हे निश्चित आहे तर त्याच्याखाली श्रेयस अय्यर चौथ्या क्रमांकावर दिसणार आहे.
बांगलादेशविरुद्ध अक्षर पटेल वरच्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता; तो पाकिस्तानविरुद्ध पाचव्या क्रमांकावरही फलंदाजी करू शकतो. यानंतर, विकेटकीपर फलंदाज केएल राहुल आणि नंतर हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा दिसतील. जडेजा, अक्षर आणि हार्दिक हे गोलंदाजीसोबतच फलंदाजीतही चमत्कार करू शकतात. कारण तिन्ही खेळाडू अष्टपैलू खेळाडूच्या भूमिकेत दिसत आहेत.
IND vs PAK : टीम इंडियाचे 5 खेळाडू करणार पाकिस्तानचं पॅकअप, विजेतेपदाच्या शर्यतीतून करणार आऊट!
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात हर्षित राणा आणि मोहम्मद शमी यांनी वेगवान गोलंदाजी केली. शमीने पाच तर राणाने तीन विकेट घेतल्या. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा पाकिस्तानविरुद्ध वेगवान गोलंदाजीची जबाबदारी या दोघांवरही असेल. कुलदीप यादवचेही खेळणे निश्चित आहे.
टीम इंडियाची प्लेइंग संभाव्य इलेव्हन:
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, कुलदीप यादव आणि मोहम्मद शमी.
पाकिस्तानची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: - इमाम उल हक, उस्मान खान, बाबर आझम, मोहम्मद रिझवान (कर्णधार आणि यष्टिरक्षक), सलमान आगा, तय्यब ताहिर / कामरान गुलाम, खुशदिल शाह, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, हरिस रौफ आणि अबरार अहमद.
कुठे, कसा अन् कधी पाहाल सामना?
भारत आणि पाकिस्तानमधील हा सुपर सामना क्रिडाप्रेमींना टीव्ही तसेच डिजिटल गॅजेट्सवर पाहता येईल. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 या स्पर्धेचे सामने प्रेक्षकांना टीव्ही तसेच डिजिटल गॅजेट्सवर पाहता येतील. टीव्हीवर हा सामना स्टार स्पोर्ट्सच्या विविध चॅनेलवर दाखवला जाईल तर JioHotstar च्या अँप तसेच वेब साईटवर सामन्यांचे लाईव्ह स्ट्रीमिंग होईल. मोबाईवर हा सामना सामना JioHotstar च्या अँपवर फ्रीमध्ये पाहता येईल. रविवारी दुपारी 2: 30 वाजता हा सामना पार पडणार असून यापूर्वी अर्धातास अगोदर दोन्ही संघांमध्ये टॉस पार पडेल.