IPL 2024 : वर्ल्ड चॅम्पियन Pat Cummins ला वाटतेय 'या' खेळाडूची भीती

जाहिरात
Read Time: 2 mins
एकाच वेळी दोन वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकणाऱ्या पॅट कमिन्सला (Pat Cummins) कुणाची भीती वाटतीय
मुंबई:

सनरायझर्स हैदराबादनं शुक्रवारी (6 एप्रिल) झालेल्या मॅचमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा 6 विकेट्सचा पराभव केला. चेन्नईनं दिलेलं 166 रन्सचं आव्हान हैदराबादनं 18.1 ओव्हर्समध्ये 4 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं.  पॅट कमिन्सच्या नेतृत्त्वाखाली खेळणाऱ्या सनरायझर्सचा या सिझनमधील हा दुसरा विजय आहे. या विजयानंतर त्यांचे चार मॅचमध्ये 4 पॉईंट्स झाले आहेत. सनरायझर्सनं यापूर्वी मुंबई इंडियन्सचा पराभव केला होता. 

Sunrisers चे हिरो कोण?

सनरायझर्स हैदराबादकडून एडन मार्करमनं 50 तर अभिषेक शर्मानं 37 रन करत विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. ट्रॅव्हिस हेडसोबत ओपनिंगला आलेल्या अभिषेकनं 12 बॉलमध्ये 37 रन्स केले. त्यानं या खेळीत तीन फोर आणि चार सिक्स लगावले. त्याचा स्ट्राईक रेट 300 पेक्षा जास्त होता. अभिषेकच्या या खेळीनं सुरुवातीच्या टप्प्यातच हैदराबादचा विजय निश्चित झाला.

कमिन्सनं केलं कौतुक

सनरायझर्स हैदराबादचा कॅप्टन पॅट कमिन्सनं मॅचनंतर बोलताना अभिषेकचं कौतुक केलं. 'अभिषेक शर्मानं चांगली फलंदाजी केली. त्याला बॉलिंग करणं मला आवडणार नाही. प्रेक्षकांनी चांगली साथ दिली. महेंद्रसिंह धोनी बॅटिंगसाठी मैदानात उतरला तेव्हा टाळ्यांचा कडकडाट वाढला होता. हे आमचं घरंच मैदान आहे, आम्हाला इथं खेळायला आवडतं,' असं कमिन्सनं मॅचनंतर बोलताना सांगितलं. 

पॅट कमिन्सनं ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन म्हणून 2023 या एकाच वर्षात टेस्ट आणि वन-डे वर्ल्ड चॅम्पियशिप स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केलाय. या ऐतिहासिक कामगिरीनंतर सनरायझर्स हैदराबादनं कमिन्सला मोठी बोली लावून खरेदी केलं आणि टीमचा कॅप्टन केलंय. वर्ल्ड चॅम्पियन टीमचा कॅप्टन असलेल्या कमिन्सनं आपल्याला अभिषेक शर्माला बॉलिंग करताना भीती वाटते हेच या उत्तरातून सांगितलंय. 

Advertisement

अभिषेकची दमदार कामगिरी

पंजाबकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या अभिषेक शर्मा या आयपीएल सिझनमध्ये चांगल्याच फॉर्मात आहे. त्यानं 4 मॅचमध्ये 217.56 च्या स्ट्राईक रेटनं 161 रन्स केले आहेत. त्यानं यामध्ये 12 फोर आणि 9 सिक्स लगावले आहेत. यापूर्वी मुंबई इंडियन्सविरुद्धही अभिषेकनं फक्त 23 बॉलमध्ये 63 रन्स केले होते.