आयपीएल 2025 मध्ये सध्या विजयासाठी झगडत असलेल्या चेन्नई सुपर किंग्सला (Chennai Super Kings) मोठा धक्का बसला आहे. त्यांचा कॅप्टन ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) उर्वरित स्पर्धेतून आऊट झाला आहे.
ऋतुराज दुखापतीमुळे उर्वरित स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याच्या अनुपस्थितीमध्ये महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) टीमचा कॅप्टन असेल, अशी माहिती टीमचा हेड कोच स्टीफन फ्लेमिंगनं दिली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
CSK ची निराशाजनक कामगिरी
महेंद्रसिंह धोनीनं मागील सिझनच्या सुरुवातीला ऋतुराज गायकवाडकडं सीएसकेची कॅप्टनशिप सोपवली होती. मागील सिझनमध्ये सीएसकेला प्ले ऑफ मध्ये प्रवेश करण्यात रनरेटच्या आधारावर अपयश आलं. या सिझनमध्ये सीएसकेची सुरुवात निराशाजनक झाली आहे.
सीएसकेनं पहिल्या पाच पैकी चार सामने गमावले आहेत. सीएसकेला आता उर्वरित प्रत्येक सामना 'प्ले ऑफ' साठी महत्त्वाचा आहे. त्या परिस्थितीमध्ये ऋतुराज स्पर्धेतून बाहेर गेल्यानं टीमला मोठा धक्का बसला आहे.
ऋतुराजनं या सिझनमधील पाच सामन्यात दोन हाफ सेंच्युरीसह 122 रन केले आहेत. मोठा स्कोर करण्यासाठी झगडणाऱ्या सीएसकेच्या बॅटिंग ऑर्डरला त्याची बॅटर म्हणून देखील कमतरता जाणवणार आहे.
( नक्की वाचा : IPL 2025 : एका इनिंगमध्ये 10 विकेट्स घेणाऱ्या बॉलरला CSK कधी घेणार? बेंचवर बसलाय यॉर्कर किंग )
दुसरिकडं महेंद्रसिंह धोनी आजही सीएसकेचा सर्वात लोकप्रिय खेळाडू आहे. धोनीच्या कॅप्टनसीमध्ये सीएसकेनं पाचवेळा आयपीएल विजेतेपद मिळवले होते. हुशार कॅप्टन अशी धोनीची क्रिकेटविश्वात ओळख आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून 2020 मध्येच निवृत्त झालेला आणि कारकिर्दीच्या अखेर टप्प्यात असलेला धोनी कॅप्टन म्हणून काय मॅजिक करतो याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.