IPL 2025, DC vs RR : दिल्लीचा सुपर ओव्हरमध्ये राजस्थानवर थरारक विजय, स्टार्कचा दिसला स्पार्क

DC vs RR, Match Result : दिल्ली कॅपिटल्सनं आयपीएल 2025 मधील चार सामने जिंकून दमदार सुरुवात केली होती.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

DC vs RR, Match Result : DC vs RR, Match Result :  आयपीएल 2025 मधील पहिली सुपर ओव्हर आज (16 एप्रिल 2025) रोजी झाली. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स हा सामना निर्धारित 20 ओव्हरमध्ये बरोबरीत सुटला. दिल्लीनं पहिल्यांदा बॅटिंग करताना 5 आऊट 188 रन केले. त्याला उत्तर देताना राजस्थानलाही 4 आऊट 188 रन काढले. 

दिल्लीकडून मिचेल स्टार्कनं सुपर ओव्हर टाकली. त्या ओव्हरमध्ये राजस्थानला 11 रन काढता आले.  दिल्लीनं हे आव्हान 4 बॉलमध्येच पूर्ण करत राजस्थानवर विजय मिळवला. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

दिल्लीनं दिलेल्या 189 रनचा पाठलाग करताना राजस्थाननं दमदार सुरुवात केली. संजू सॅमसन (Sanju Samson)  आणि यशस्वी जैस्वाल (Yashasvi Jaiswal ) नं पहिल्या विकेटसाठी 61 रनची भागीदारी केली. त्यानंतर संजू सॅमसन 31 रनवर खेळत असताना रिटायर हर्ट झाला.

रियान परागला फारशी कमाल करता आली नाही. तो फक्त 8 रन काढून झाला. यशस्वीनं या सिझनमधील तिसरी हाफ सेंच्युरी झळकावली. पण, त्याचा हा आनंद फार काळ टिकला नाही. तो 51 रन काढून आऊट झाला. 

Advertisement

यशस्वी आऊट झाल्यानंतर मुळचा दिल्लीकर असलेल्या नितीश राणानं मॅचची सूत्रं हाती घेतली. त्यानं 28 बॉलमध्ये 6 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीनं 51 रन काढले. 

दिल्लीकडून अभिषेकची फटकेबाजी

पहिल्यांदा बॅटिंग करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सनं सुरुवात दमदार केली होती. अभिषेक परोलनं (Abishek Porel ) तुषार देशपांडेच्या एकाच ओव्हरमध्ये 23 रन काढले. त्यानंतर दिल्लीच्या दोन विकेट्स झटपट गेल्या. मागील सामन्यात दमदार हाफ सेंच्युरी करणारा करुण नायर शून्यावर रनआऊट झाला.

Advertisement

( नक्की वाचा : IPL 2025 : पंजाबचा KKR ला दे धक्का, गतविजेत्यांवर मिळवला सनसनाटी विजय, नवा रेकॉर्डही केला )
 

अभिषेकनं केएल राहुलसोबत (KL Rahul) तिसऱ्या विकेटसाठी 63 रनची पार्टनरशिप केली. राहुल 38 रन काढून आऊट झाला. तर अभिषेकची हाफ सेंच्युरी फक्त 1 रननं हुकली. अक्षर पटेलनं 14 बॉलमध्ये  34 रन काढले. तर ट्रिस्टर स्टब्सनं 18 बॉलमध्ये नाबाद 34 रन काढले. या दोघांच्या फटकेबाजीमुळे दिल्लीनं निर्धारित 20 ओव्हरमध्ये 5 आऊट 188 रन केले.
 

Topics mentioned in this article