GT vs MI : गुजरातच्या पराभवाचा धक्का, नेहराचा मुलगा आणि गिलची बहीण धाय मोकलून रडले! पाहा Video

IPL 2025, GT vs MI : मुंबई इंडियन्सविरुद्धच्या पराभवानंतर  काही व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहेत. त्यामध्ये गुजरातचे फॅन्स खूप निराश दिसत आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
GT vs MI : शुबमन गिलच्या बहिणीला पराभवानंतर अश्रू रोखता आले नाहीत.
मुंबई:

Shubman Gill Sister and Ashish Nehra Son Cried After Gujarat Titans Loss: गुजरात टायटन्सचा आयपीएल 2025 मधील प्रवास आता संपला आहे. शुक्रवारी (30 मे) रोजी झालेल्या एलिमेनेटर मॅचमध्ये गुजरातची लढत मुंबई इंडियन्सची (GT vs MI) होती. स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी गुजरातला तो सामना जिंकणे आवश्यक होते. मुंबईनं दिलेल्या 229 रन्सच्या टार्गेटचा पाठलाग करताना गुजरातनं जोरदार प्रतिकार केला. पण, त्यांना अपयश आलं. या पराभावामुळे गुजरात टायटन्सचे फॅन्स कमालीचे नाराज झाले आहेत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या पराभवानंतर  काही व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहेत. त्यामध्ये गुजरातचे फॅन्स खूप निराश दिसत आहेत. या पराभवानंतर हेड कोच आशिष नेहराचा (Ashish Nehra) धाकटा मुलगा आणि शुभमन गिलची (Shubman Gill) बहीण शहनील गिल यांनाही त्यांचे अश्रू रोखता आले नाहीत. ते स्टँड्समध्ये ढसाढसा रडतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

( नक्की वाचा :  GT vs MI : शुबमन गिल आणि हार्दिक पांड्यातील वाद उघड, मैदानातील 2 घटनांमुळे खळबळ! पाहा Video )

तीन पराभव आणि गुजरात बाहेर

गुजरात टायटन्सनं या सिझनची सुरुवात दमदार केली होती. पण, शेवटच्या टप्प्यात त्यांनी निराशा केली. शुक्रवारी त्यांना या सिझनमधील सलग तिसरा पराभव सहन करावा लागला. बई इंडियन्सविरुद्धच्या पराभवापूर्वी त्यांना लीग स्टेजमध्ये लखनऊ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्सविरुद्धही पराभवाचा सामना करावा लागला होता. 

Advertisement

मुंबई इंडियन्सनं या मॅचमध्ये पहिल्यांदा बॅटिंग करत गुजरातसमोर विजयासाठी 229 रन्सचं आव्हान ठेवलं होतं.  गुजरातला निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 6 आऊट 208 पर्यंतच मजल मारता आली. गुजरातकडून साई सुदर्शननं सर्वात जास्त 80 रन्स काढले.
 

Topics mentioned in this article