
आयपीएल 2025 मध्ये गुजरात विरुद्ध पंजाब यांच्यात सामना सुरू आहे. या सामन्यात श्रेयस अय्यर यांने कर्णधारपदाला शोभेल अशी खेळी केली. त्यांने गुजरातच्या गोलंदाजांची अक्षरश: पिसं काढली. प्रियांश आर्या आणि प्रभसिमरन सिंग यांनी पंजाबच्या डावाची सुरूवात केली. पण प्रभसिमरन सिंग अवघ्या पाच धावांवर बाद झाला. त्याला रबाडाने बाद केले. त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर आणि प्रियांश यांनी संघाचा डाव सावरला. प्रियांशने श्रेयसला चांगली साथ देत 47 धावा केल्या. त्यात त्याने दोन षटकार आणि सात चौकार लगावले. त्याला राशिद खानने बाद केलं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
त्यानंतर सर्व सामन्याची सुत्र श्रेयसने आपल्या हातात घेतली. त्याने चौफेर फटकेबाजी करत गुजरातच्या गोलंदाजांच्या नाकीनऊ आणले. त्याने एक हाती किल्ला लढवला. पण त्याचे शतक थोडक्यात हुकले त्याने 42 चेंडूत 97 धावांची जबरदस्त खेळी केली. त्यात त्याने 9 षटकार आणि 5 चौकार ठोकले. त्याच्या या खेळी मुळे पंजाबला 20 षटकात 243 धावांचा डोंगर उभारता आला. त्याच्या या खेळी मुळे गुजरात समोर 244 धावांचे महाकाय लक्ष आहे.
ट्रेंडिंग बातमी - DC Vs LSG: दिल्लीच्या आशुतोषची कमाल खेळी! हरलेला सामना फिरवला, लखनौचा पराभव
श्रेयसला दुसऱ्या बाजूने हवी तशी साथ मिळाली नाही. ओमरझाई याने पंधरा चेंडूत सोळा धावा केल्या. त्यात एक षटकार आणि दोन चौकारांचा समावेश आहे. त्यानंतर आलेला ग्लेन मॅक्सवेल मात्र अपयशी ठरला. त्याला खातं ही खोलता आलं नाही. तो शुन्यावर बाद झाला. मार्क स्टोईनीस याने वीस धावा केल्या. त्यानंतर आलेल्या शशांक सिंग याने मात्र शेवटच्या षटकात चांगली फटकेबाजी केली. त्याने 16 चेंडूत 44 धावा केल्या. या खेळीत त्याने दोन षटकार आणि सहा चौकार लगावले. रवी श्रीनिवास याने गुजरातकडून तीन विकेट घेतल्या. अन्य गोलंदाजांना आपली छाप पाडता आली नाही.