IPL 2025, MI vs GT : रोहित शर्माकडून रेकॉर्ड्सचा पाऊस, दमदार खेळीसह केले नवे पराक्रम

आयपीएल 2025 मध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजराट टायटन्स (Mumbai Indians vs Gujrat Titans) यांच्यातील एलिमेनेटर सामन्यात रोहित शर्मानं (Rohit Sharma ) अनेक विक्रमांची नोंद केली आहे. दो

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

आयपीएल 2025 मध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजराट टायटन्स (Mumbai Indians vs Gujrat Titans) यांच्यातील एलिमेनेटर सामन्यात रोहित शर्मानं (Rohit Sharma ) अनेक विक्रमांची नोंद केली आहे. दोन्ही टीमसाठी हा सामना 'करो वा मरो' स्वरुपाची आहे. या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्यानं टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंगचा निर्णय घेतला.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

रोहित शर्मानं हार्दिकचा हा निर्णय खरा ठरवत दमदार बॅटिंग केली. त्यानं मुंबई इंडियन्सकडून पहिल्यांदाच खेळणाऱ्या जॉनी बेअरस्टोसोबत पहिल्या विकेटसाठी 84 रन्सची पार्टनरशिप केली. रोहितनं त्याची हाफ सेंच्युरी 28 बॉलमध्ये हाफ सेंच्युरी पूर्ण केली. त्याची आयपीएल कारकिर्दीमधील ही 47 वी हाफ सेंच्युरी आहे.

रोहितनं यावेळी आयपीएल कारकिर्दीमधील 7000 रन्स पूर्ण केले. त्याचबरोबर या स्पर्धेत 300 सिक्सचा टप्पा देखील पूर्ण केला. हा टप्पा गाठणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू आहे. तर ख्रिस गेलनंतरचा दुसरा बॅटर आहे. 

रोहित शर्मानं 266 इनिंगमध्ये 7000 रन्स केले. आयपीएलमध्ये 7000 रन्स करणारा रोहित हा दुसरा बॅटर आहे. आयपीएलमध्ये सर्वात जास्त रन्स करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. विराटनं आत्तापर्यंत 266 इनिंगमध्ये 39.53 च्या सरासरीनं 8618 रन्स केले आहेत. विराटनं यामध्ये 8 सेंच्युरी आणि 63 हाफ सेंच्युरी झळकावल्या आहेत.

Advertisement

( नक्की वाचा : IPL 2025 : अनुष्का शर्माच्या बाजूला बसलेली 'ही' महिला कोण आहे? RCB च्या प्रत्येक मॅचला असते उपस्थित )
 

रोहित शर्मानं गुजरात टायटन्सविरुद्ध 81 रन्सवर आऊट झाला. त्यानं 50 बॉलमध्ये 9 फोर आणि 4 सिक्सच्या मदतीनं ही खेळी केली. आयपीएल 2025 मधील हा एलिमेनेटर सामना आहे. या मॅचमध्ये पराभूत झालेल्या टीमचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येणार आहे. तर विजयी टीमची रविवारी (1 जून 2025) पंजाब किंग्ज विरुद्ध लढत होईल. 

Topics mentioned in this article