IPL 2025 : राजस्थाननं रोखला, पंजाबचा विजयरथ! घरच्या मैदानावर दिला पराभवाचा धक्का

या स्पर्धेत पहिले दोन सामने जिंकून दमदार सुरुवात करणाऱ्या श्रेयस अय्यरच्या पंजाबचा हा पहिलाच पराभव आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

IPL 2025, PBKS vs RR : आयपीएल 2025 मध्ये शनिवारी (5 एप्रिल) पंजाब किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स (Punjab Kings vs Rajasthan Royals) यांच्यात सामना झाला. त्यामध्ये राजस्थाननं 50 रन्सनं विजय मिळवला. या स्पर्धेत पहिले दोन सामने जिंकून दमदार सुरुवात करणाऱ्या श्रेयस अय्यरच्या पंजाबचा हा पहिलाच पराभव आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

राजस्थाननं दिलेलं 206 रन्सचं आव्हान पंजाबला पेलवलं नाही. जोफ्रा आर्चरनं पंजाबच्या इनिंगमधील पहिल्याच बॉलवर टीमला यश मिळवून दिलं. त्यानं प्रियांश आर्याला शून्यावर आऊट केलं. त्यानंतर प्रबसिमर सिंग (17) श्रेयस अय्यर (10) आणि मार्कस स्टॉईनिस (1) मोठा स्कोअर करण्यात अपयशी ठरले. त्यामुळे पंजाबची अवस्था 4 आऊट 43 झाली होती.

नेहाल वढेरा आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी पाचव्या विकेटसाठी 85 रन्सची पार्टनरशिप करत प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. हसरंगानं सलग दोन बॉलवर दोघांना आऊट करत सामना राजस्थानच्या बाजूनं झुकवला. पंजाबकडून नेहालनं सर्वात जास्त 62 रन्स काढले. 

( नक्की वाचा : IPL 2025 , CSK vs DC : चुकीला माफी नाही ! अक्षर पटेलनं विकेट किपरवर भर मॅचमध्ये केली कारवाई )
 

यशस्वीची हाफ सेंच्युरी 

त्यापूर्वी राजस्थान रॉयल्सकडून यशस्वी जैस्वालनं या सिझनमधील पहिली हाफ सेंच्युरी झळकावली. काही दिवसांपूर्वीच मुंबईची रणजी टीम सोडून गोव्याची वाट पकडणाऱ्या यशस्वीनं या सामन्यात पहिल्यापासूनच आक्रमक खेळ केला. त्यानं 45 बॉल्समध्ये 67 रन काढले.

Advertisement

कॅप्टन संजू सॅमसननं 38 रन्सची खेळी केली. यशस्वी आणि संजू या ओपनिंग जोडीनं पहिल्या विकेटसाठी 89 रन्सची पार्टरनरशिप केली. त्यानंतर रियान परागनं 25 बॉलमध्ये नाबाद 43 रन करत राजस्थानला 200 रनचा टप्पा ओलांडून दिला. 

राजस्थानचा या सिझनमधील हा दुसरा विजय आहे. त्यांनी यापूर्वी गुवाहाटीमध्ये झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा पराभव केला होता. पहिले दोन सामने गमावत स्पर्धत खराब सुरुवात करणाऱ्या राजस्थाननं नंतरचे दोन सामने जिंकत पुनरागमन केलं आहे. 

Advertisement
Topics mentioned in this article