IPL 2025, Rajasthan Royals : आयपीएल 2025 सुरु होऊन एक आठवडा झाला आहे. मेगा ऑक्शननंतर सर्वच टीम नव्या खेळाडूंसह या स्पर्धेत उतरले आहेत. त्यामुळे त्या खेळाडूंसह टीम ओळखण्यास फॅन्सना वेळ लागतोय. त्याचप्रमाणे फ्रँचायझी देखील त्यांच्या सर्वोत्तम 11 खेळाडूचा शोध घेत आहेत. सर्व टीम स्थिर होण्यापूर्वीच राजस्थान रॉयल्सनं कॅप्टन बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
राजस्थान रॉयल्सनं आत्तापर्यंत 3 सामने खेळले आहेत. पहिल्या दोन सामन्यात त्यांचा पराभव झाला. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात त्यांनी चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) पराभव करत पाँईट टेबलमध्ये खातं उघडलं. या तिन्ही सामन्यात रियान परागनं (Riyan Parag) राजस्थानचं नेतृत्त्व केलं होतं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आता रियान परागच्या जागी संजू सॅमसन (Sanju Samson) राजस्थानचा कॅप्टन होणार आहे. संजू दुखापतीमुळे या स्पर्धेतील पहिले तीन सामने इम्पॅक्ट प्लेयर म्हणून फक्त बॅटर म्हणून खेळला आहे. संजूच्या उजव्या हाताच्या बोटाचं ऑपरेशन झालं आहे. त्यानंतर बीसीसीआयनं त्याला या स्पर्धेत तात्पुरती खेळण्याची परवानगी दिली होती.
आता आपल्याला विकेटकिपिंग करण्याची परवानगी द्यावी यासाठी संजू गुवाहटीहून बेंगळुरुमध्ये दाखल झाला आहे. क्रिकबझनं दिलेल्या रिपोर्टनुसार संजू आता बेंगळुरुमध्ये वेगवेगळ्या टेस्ट देईल. त्या टेस्टनंतर त्याला विकेटकिपिंग करण्याची परवानगी मिळाली तर राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन होईल.
( नक्की वाचा : MS Dhoni : धोनी 9 नंबरवर बॅटिंगला का आला? CSK च्या कोचनं सांगितलं खरं कारण )
राजस्थानचा पुढचा सामना 5 एप्रिल रोजी पंजाब किंग्ज विरुद्ध होणार आहे. त्यानंतर 9 एप्रिल रोजी त्यांची पुढील लढत अहमदाबादमध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध होईल. राजस्थानचा जयपूरमधील पहिला सामना 13 एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगुळुरु (RCB) विरुद्ध आहे.
संजूनं या स्पर्धेतील पहिल्या मॅचमध्ये हाफ सेंच्युरी झळकावत 66 रन्स केले होते. त्यानंतरच्या पुढील दोन मॅचमध्ये त्यानं अनुक्रमे 13 आणि 20 रन्स काढले. संजूच्या अनुपस्थितीमध्ये ध्रुव जुरेलनं विकेट किपिंगची जबाबदारी सांभाळली आहे.